नवी मुंबई : महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. त्यामुळे सोमवारपासून (28 जून) नवी मुंबईत नवीन निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून नवी मुंबईत स्टेज 3 नुसार नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. (Navi Mumbai Commissioner declare new restriction amid corona pandemic third wave)
राज्य शासनाने राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर नवी मुंबईतही स्टेज 3 नूसार कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत उद्यापासून (28 जून) निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत लेखी आदेश आज जारी केले आहेत.
राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण कमी झाले असले तरी नव्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन प्रशासन खबरदारी घेताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेनेही याच पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू केले आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवांमधील दुकानं आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक दुकानां व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. ही दुकानं शनिवार व रविवार पूर्णत: बंद राहतील. मॉल, सिनेमागृह नाट्यगृह संपूर्णतः बंद राहणार आहेत
रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. दुपारी 4 नंतर तसेच शनिवाी व रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत फक्त घरपोच सेवा सुरु राहिल. प्रत्यक्ष जाऊन पार्सल घेणे बंद राहील, सर्व रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट इत्यादींना दर्शनी भागावर बाहेरील बाजूस एकूण आसनक्षमता आणि 50 टक्के प्रमाणे परवानगी असलेली आसन क्षमता यांचा बोर्ड लावावा लागणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या सुचनांचे स्टीकर्स लावणे देखील बंधनकारक असणार आहे.
इतर बातम्या
डेल्टा विषाणूचा धोका ओळखून पालिका प्रशासनाची पावलं, सोमवारपासून पिंपरी चिंचवडमध्ये काय सुरू काय बंद?
गडचिरोली जिल्ह्यात नवे निर्बंध, दुकाने 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार, जाणून घ्या काय बंद काय सुरु?
दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, डेल्टा प्लसचा धोका, निर्बंधात बदल, अकोल्यात काय सुरु काय बंद?
(Navi Mumbai Commissioner declare new restriction amid corona pandemic third wave)