नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी वाशी रेल्वे स्थानकातील परिसरात सापळा रचून 27 लाखांचा गुटखा व तीन वाहने असा सुमारे 80 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन दिवसांपूर्वी ओरिसा भवन परिसरात गुटखा येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी कारवाई करत असताना शहरातला सर्वात मोठा गुटख्याचा पुरवठादार करण साळुंखे याने पोलिसांवर पिस्तुल रोखून पळ काढला होता. मात्र, करण साळुंखेला देखील पोलिसांनी काल अटक केली असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी दिली. (Navi Mumbai Gutkha King Karan Salunkhe arrested with five accused; 80 lakh confiscated)
मागील अनेक वर्षांपासून तो नवी मुंबईत गुटखा विक्रीचे रॅकेट चालवत आहे. अप्पर पोलीस आयुक्त महेश धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर व वाशी पोलिसांच्या पथकाने पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून एका टेम्पोमधून आणलेला गुटखा इतर दोन गाड्यांमध्ये भरला जात असताना पोलिसांनी छापा टाकला. यावेळी एक आयशर टेम्पो, बोलेरो पिकअप या वाहनांमधून विमला गुटखा जप्त करण्यात आला आहे.
मात्र, मुख्य सूत्रधार करण साळुंखेसह इतर साथीदारांनी देखील अंधारात पळ काढण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी इतरांना ताब्यात घेतले. तर अजयकुमार गौड, गोविंद बोडारे, घेवाराम देवाशी, अक्षय गायकवाड व राहुल कुमार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर करण साळुंखेकडून एक पिस्तुल व काही रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिली आहे. तर आणखी काही आरोपीचा समावेश आहे का? शिवाय हा गुटखा कोठे विक्रीसाठी आणला होता. याबाबतचा तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत.
गुटखा माफियाकडून गेली वर्षभरात नवी मुंबई शहरातील अंमली विरोधी पथकातील दोन तर एपीएमसी पोलीस ठाण्याचे तीन असे एकूण पाच अधिकारी आणि कर्मचारी यांना लाचलुचपत विभागाकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसायाला अडथळा ठरलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुटखा माफियांनी अशाप्रकारे अडचणीत आणल्याची चर्चा शहरात सुरु आहे. अशा नियमित कारवाया होत असल्या तरी अन्न औषध प्रशासन विभाग आणि शहर पोलीस यांच्यात समनव्य नसल्याने शहरात सर्रास गुटखा विक्री होत असल्याचे बोलले जात आहे याकडे गांभियाने लक्ष्य देणे गरजेचे आहे. (Navi Mumbai Gutkha King Karan Salunkhe arrested with five accused; 80 lakh confiscated)
Mumbai Rain : मुंबईत 23 तारखेपर्यंत पावसाचा जोर, मुसळधार पावसाची शक्यता, सखल भागात पाणी साचण्याचा अंदाजhttps://t.co/YOvkODHeXk#MumbaiRain | #WeatherForecast | #Weather | #Skymet
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 20, 2021
इतर बातम्या
LIC ची जबरदस्त योजना! 2582 रुपयांच्या बचतीवर मिळणार 1 कोटी, दरमहा 6 हजारांची पेन्शन