कर्नाळा पक्षी अभयारण्यातील वन्य जीवांच्या संरक्षणासाठी मानवी साखळी, उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा स्वयंसेवी संस्थांचा इशारा

| Updated on: Sep 06, 2021 | 2:08 PM

कर्नाळा पक्षी अभयारण्यातील वन्य जीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाकडून लाखो रुपये खर्च करनही आठवड्यातून किमान एक ते दोन माकडे आणि पक्ष्यांचा अपघातात जीव जात असतो. हे जीव वाचवण्यासाठी वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याचा संताप व्यक्त करीत प्राणीमित्र स्वयंसेवी संस्था आक्रमक झाल्या आहेत.

कर्नाळा पक्षी अभयारण्यातील वन्य जीवांच्या संरक्षणासाठी मानवी साखळी, उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा स्वयंसेवी संस्थांचा इशारा
human chain for the protection of wildlife
Follow us on

नवी मुंबई : कर्नाळा पक्षी अभयारण्यातील वन्य जीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाकडून लाखो रुपये खर्च करनही आठवड्यातून किमान एक ते दोन माकडे आणि पक्ष्यांचा अपघातात जीव जात असतो. हे जीव वाचवण्यासाठी वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याचा संताप व्यक्त करीत प्राणीमित्र स्वयंसेवी संस्था आक्रमक झाल्या आहेत. वन विभागाने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढील एक महिन्यात उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोकण कट्टा विलेपार्ले आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था , बांधनवाडी पनवेल यांनी दिला आहे ह्या स्वयंसेवी संस्थाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

तसेच, कर्नाळा पक्षी अभयारण्य हद्दीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मानवी साखळी निर्माण करीत वन्य जीव संरक्षणासाठी उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्य प्रशासनाचा निषेध करण्यात आला. त्यासोबतच महामार्गावरील प्रवासी आणि पर्यटकांना माहिती पत्रके वाटून आणि हातात बॅनर्स घेऊन जनजागृतीही करण्यात आली.

स्वयंसेवी संस्थांची मागणी काय?

अभयारण्यात रॅली काढून कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये पशु-पक्षी आणि प्राण्यांवर उपचारासाठी पशु वैद्यकीय सुविधा तात्काळ करण्यात यावी.

कर्नाळा पक्षी अभयारण्यात येणाऱ्या सर्व पर्यटक आणि प्रवाशांना वन्यजीव संरक्षण कायद्याबाबत माहिती देण्यात यावी.

त्यासाठी तिकीट काउंटरवर माहिती पत्रके देण्यात यावीत.

सध्या लावण्यात आलेल्या साऊंड ब्रेकर वॉलच्या वरचे टॉप सरफेस निमुळते करण्यात यावे किंवा काटेरी तार लावण्यात यावी.

मंकी लॅडरची संख्या वाढविण्यात यावी.

अभयारण्य हद्दीतील महामार्गावर रंबलर स्ट्रिप्स मारण्यात याव्यात.

खाद्यपदार्थ टाकणाऱ्या बेशिस्त प्रवासी आणि पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी सी.सी. टी.व्ही कॅमेरे लावण्यात यावे.

वन कर्मचाऱ्यांमार्फत महामार्गावर गस्त घालण्यात यावी.

अशा मागण्यांचे निवेदन कर्नाळा पक्षी अभयारण्य वन परिक्षेत्र अधिकारी राठोड यांना देत पुढील महिन्याभरात सदर उपाययोजनांवर कारवाई न केल्यास कर्नाळा अभयारण्य प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला. तर कर्नाळा अभयारण्य वन परिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी रॅलीला सामोरे जात निवेदनात मांडलेल्या उपाययोजनांवर कारवाई करण्याबाबतचे आश्वासन दिले.

या मानवी साखळीत कोकण कट्टा, विलेपार्ले संस्थापक अजित पितळे ग्राम संवर्धन सामाजिक संस्था अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर कोकण कट्टा खजिनदार सुजित कदम, जगन्नाथ गावडे, दया मांडवकर, विनेश सितापराव, बालग्राम प्रकल्प समन्वयक उदय गावंड, राजेश रसाळ, जितेंद्र उरणकर, जीविता पाटील, देवेन्द्र केळुसकर, आत्माराम डिके, राहुल वर्तक, दिलीप पवार मिलिंद पालेकर, दीपक राणे प्रभाकर सांडम, अशोक जडीयार, मनीष माईन, बालग्राम मित्र जयेश शिंदे शैलेश, कोंडसकर, राजू पाटील, रणजीत पाटील, जगदीश डंगर, तेजस चव्हाण, सचिन पाटील, सिद्धेश चव्हाण, राजेश पाटील, सचिन गावंड, यांच्यासह 173 प्राणीमित्र सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या :

मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये बदामाच्या दरात 250 रुपयांची घसरण; सुकामेव्याचे दर स्थिर

पूजेच्या साहित्याने पनवेल बाजारपेठ फुलली, गणेशोत्सवामुळे पूजेच्या साहित्याला मोठी मागणी