नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी (Navi Mumbai News) आहे. खारघर, उलवे तसंच जेएनपीटी (JNPT) परिसरात दोन दिवस पाणीपुरवठा (water supply) बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पालिका प्रशासनकडून नवी मुंबईकरांना केलं जातंय. दोन दिवस खारघर, उलवे आणि जेएनपीटी परिसरात पाणी पुरवठा बंद राहिलं, असं सांगण्यात आलंय. 3 जून (आज) आणि 4 जून (उद्या) असा सलग दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणर आहे. त्यामुळे लोकांनी पाणी जपून वापरावं आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन करण्यात आलंय.
जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम पूर्ण करण्याचं आव्हान सध्या प्रशासनासमोर आलं. त्यामुळे तातडीनं हे काम पूर्ण करण्यासाठी उद्या आणि परवा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
याआधी 24 मे रोजी नवी मुंबई बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.दरम्यान, पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यानं नागरिकांना आताच पर्यायी व्यवस्था करुन पाण्याचा जपून वापर करावा, असं सांगण्यात आलंय. तर पालिकेकडून केल्या जाणाऱ्या दुरुस्तीच्या कामाला सहकार्य करण्याचंही आवाहन करण्यात आलंय.
खारघर, कळंबोली, पनवेल या भागाला हेटवणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. वेगवेगळ्या जलवाहिन्यांद्वारे पालिका क्षेत्रात रहिवाशांना पाणी पुरवठा केला जातो. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
3 जून आणि 4 जून असा सलग दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे लोकांनी पाणी जपून वापरावं आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन करण्यात आलंय. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पालिका प्रशासनकडून नवी मुंबईकरांना केलं जातंय. दोन दिवस खारघर, उलवे आणि जेएनपीटी परिसरात पाणी पुरवठा बंद राहिलं, असं सांगण्यात आलंय.