आधुनिक शहर म्हणून विशेष मराठी, इंग्रजीसह ओळख निर्माण झालेल्या नवी मुंबई विविध भाषांतील शहरात वाचन संस्कृती वाढावी पुस्तकांचा खजिना यासाठी यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंट्रल लायब्ररी उभी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या लायब्ररीसाठी जुईनगर रेल्वे स्थानकाच्या नजीक असलेल्या भूखंड पालिका प्रशासनाने सिडकोकडून हस्तांतरित केला आहे. महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरात 19 अद्ययावत ग्रंथालय चालवले जात असून त्यामध्ये सुमारे एक लाख पुस्तके ठेवण्यात आले आहेत. या सेंट्रल लायब्ररीच्या निर्मितीनंतर पुस्तकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जुईनगर रेल्वे स्टेशननजीक सेक्टर 11 मध्ये एक क्रमांकाचा भूखंड सिडकोकडून पालिकेस ग्रंथालयाकरिता हस्तांतरित झाला असून या ठिकाणी चार मजली ग्रंथालय उभारण्यात येत आहे. ग्रंथालय इमारत उभारताना जगभरातील आधुनिक ग्रंथालय इमारतींच्या वास्तूंचा अभ्यास करून इतरांपेक्षा वेगळ्या स्वरूपाची वास्तू उभी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे.
या ग्रंथालय इमारतीत नवी मुंबई क्षेत्रातील विविध भाषिक नागरिकांचा विचार करून मराठी व इंग्रजी भाषांप्रमाणेच विविध भाषांतील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाचनासाठी ग्रंथ उपलब्धतेप्रमाणेच त्या ठिकाणी साहित्यविषयक उपक्रम साजरे करण्यासाठी प्रेक्षागृहासह रंगमंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रंथ व सांस्कृतिक प्रदर्शनासाठी वैशिष्ट्यपूर्ण दालन व्यवस्था, ग्रंथरचनेचा इतिहास प्रदर्शित करण्यासाठी नावीन्यपूर्ण रचना केली जाणार आहे.
शहराची नॉलेज सिटी म्हणून ओळख स्वच्छ शहर म्हणून देशपातळीवर विशेष ख्याती निर्माण केलेल्या नवी मुंबईची ओळख आता नॉलेज सिटी म्हणूनही होऊ लागली आहे. त्या उपमेला साजेसे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय नवी मुंबईत असावे या भूमिकेतून या लायब्ररीची निर्मिती करण्यात येत आहे. जगभरातील ग्रंथालयांचा अभ्यास करून या वास्तूची निर्मिती करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केली आहे.