नवी मुंबई – नवी मुंबईत (Navi Mumbai) खाडीच्या किनारी अधिक फ्लेमिंगो पाहायला मिळतात. त्यामुळे पालिकेने फ्लेमिंगोचं (flemingo) शहरात वास्तव आहे. हे नागरिकांच्या आणि पाहुण्यांच्या लक्षात यावं यासाठी लोखंडी फ्लेमिंगोची प्रतिकृती तयार केल्या होत्या. त्या प्रतिकृती महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या. साधारण 12 प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या. त्यापैकी 10 फ्लेमिंगोच्या प्रतिकृती चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे. शहरात नव्याने येणाऱ्या पाहुण्यांना फ्लेमिंगोचं वास्तव असल्याचं लक्षात यावं यासाठी या प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या. पण चोरीला गेल्याने चर्चेचा विषय झाला आहे. ठाणे (Thane) खाडी हे फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून सरकारने जाहीर केलं आहे.
हिवाळा सुरू झाल्यानंतर अनेकदा तुम्हाला नवी मुंबईत फ्लेमिंगो आढळून येतात. विशेष म्हणजे थंडीला सुरूवात झाल्यानंतर फ्लेमिंगोचे थावे नवी मुंबईतल्या खाडीवर येतात. त्यावेळी तिथं बघ्यांची अधिक गर्दी देखील पाहायला मिळते. पक्षीप्रेमी हे सगळं दृष्य पाहण्यासाठी अधिक लांबून दाखल होतात. विशेष म्हणजे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो दाखल होत असल्याने पालिका प्रशासनाने महत्त्वाच्या ठिकाणी फ्लेमिंगोच्या प्रतिकृती उभारल्या आहेत. त्यापैकी काही प्रतिकृती चोरीला गेल्याचं उघडकीस आलं आहे.
वाशी आणि तुर्भे येथे फक्त दोन फ्लेमिंगोच्या प्रतिकृती उरल्या आहेत. नेमक्या त्या प्रतिकृती कोणी चोरल्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बारा प्रतिकृतीपैकी फक्त दोन उरल्या आहेत. ज्यावेळी त्या फ्लेमिंगोच्या प्रतिकृती लावल्या होत्या, त्यावेळी मुंबईच्या वैभवात भर पडली होती. आता नवी मुंबई महापालिका त्यावर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.