नवी मुंबई : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरु केली आहे. रात्री दहानंतरही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या 3 बारवर कारवाई केली असून त्यांच्यावर प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात 404 जणांवर कारवाई केली असून 2 लाख 72 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
नवी मुंबईमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु अनेक हॉटेल चालक रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या दक्षता पथकानेही कारवाई सुरू केली आहे. सेक्टर 19-डीमधील लिव्ह इट अप रेस्टॉरंट बारमध्ये रात्री 11 नंतरही ग्राहक असल्याचे निदर्शनास आले. कोपरखैरणे सेक्टर-9 मधील मयूर रेस्टॉरंट आणि बार आणि बेलापूर सेक्टर-11 मधील बिग बॉस या हॉटेलवर छापा टाकला असता उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याचे निदर्शनास आले.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन झाले नाही तर रुग्ण संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हॉटेल चालकांनी पहिल्यांदा नियम मोडल्यास 50 हजार रुपये दंड दुसऱ्यांदा नियम मोडल्यास 7 दिवसांकरिता अस्थापना बंद ठेवण्यात येणार असून तिसऱ्या वेळी नियम मोडल्यास कोरोना महामारी संपेपर्यंत हॉटेल बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.एका वर्षात 74286 जणांवर कारवाई
महानगरपालिका प्रशासनाने 10 ऑगस्ट 2020 पासून कोरोना नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई करण्यासाठी दक्षता पथक तयार केले आहे. या पथकाने वर्षभरात तब्बल 74286 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 3 कोटी 91 लाख 7 हजार 100 रुपये दंड वसूल केला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नवी मुंबई महापालिका सज्ज, आयुक्तांकडून आरोग्य सुविधांचा आढावाhttps://t.co/UbjP2mUGos#CoronaVirus #CoronaThirdWave #navimumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 16, 2021
संबंधित बातम्या :
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याला अच्छे दिन, दरात दुपटीनं वाढ, शेतकऱ्यांना दिलासा
खारघर, द्रोणागिरी, उलवे परिसरात पाणीकपात; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार