नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai News) शनिवारी (11 June) मोठी दुर्घटना घडली. नवी मुंबईच्या नेरुळमध्ये (Nerul Building slab collapse News) एका इमारतीच्या सहाव्या मजल्यापासून ते तळापर्यंत हॉलचा स्लॅब कोसळला. यामध्ये दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सहा ते सात जण जखमी झालेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई पालिकेच्या (Navi Mumbai Municipality) अग्निशमन दलानेही तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं. या घटनेमुळे इमारतीमधील इतर रहिवाशांची घाबरगुंडी उडाली आहे. अक्षरशः पत्त्याप्रमाणे या इमारतीच्या हॉलचा स्लॅब सहाव्या माळ्यापासून ग्राऊंड फ्लोअरपर्यंत कोसळला. ही घटना नेरुळच्या सेक्टर 17 मध्ये घडली.
नेरुळच्या सेक्टरमध्ये 17 मध्ये असलेल्या जिमी पार्क या इमारतीच्या ए विंगमधील सर्व घरांच्या हॉलचा स्लॅब कोसळला. सहाव्या मजल्यापासून ते तळमजल्यापर्यंतच्या घरांचा हॉलचा स्लॅब पत्त्याप्रमाणे कोसळल्यानंतर रहिवाशांची एकच पळापळ झाली. या घटनेनंतर इमारतीमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. दरम्यान, तातडीनं याबाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बजावकार्य केलं. 1994 साली सदर इमारतीला ओसी मिळाली होती. शनिवारी दुपारी 12.45 मिनिटांनी ही घटना घडली.
सगळ्यात आधी जिमी पार्क इमारतीच्या ए विंगमधील सहाव्या माळ्यावरील घराच्या हॉलचा संपूर्ण स्लॅब कोसळला. पाचव्या माळ्यावर घराचा स्लॅब कोसळल्यानंतर या घराच्या हॉलचाही स्लॅब खाली आला आणि मग एक एक करुन सर्वच घरांचे स्लॅब कोसळले. या दुर्घटनेत एका 29 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झालेत. या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावं, अशी नोटीस सोसायटीला महापालिकेनं पाठवलेली होती. मात्र नेमकी ही दुर्घटना कोणत्या कारणानं घडली, याचा आता शोध घेता जातोय. तर तूर्तास दुर्घटनाग्रस्त घरांमधील कुटुंबांच्या राहण्याची पर्यायची व्यवस्था पालिकेनं केलं आहे. पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
अपघातात व्यंकटेश नाडार या 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू.
जखमी : सुब्रमण्यम त्यागराजन (84), निशा धर्मानी (50), रिया धर्मानी (20), सोनाली गोडबोले (29), आदित्यराज गोडबोले (15), सौमित्र गोडबोले (50), ललिता त्यागराजन (80)
या दुर्घटनेतील सर्व जखमींना तातडीने डी व्हाय पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.