नवी मुंबई : राज्यात तीन पक्षांचे सरकार भक्कमपणे काम करत असले तरी, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचं पुढे येत आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ही नाराजी आता समोर येतेय. येथील राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश भोर (Rajesh Bhor) पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. (Navi Mumbai NCP leaders and youth district president Rajesh Bhor will resign from party)
राज्यात कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, वसई विरार तसेच नवी मुंबई या महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यात नेत्यांनी राजकीय गणितं आखायला सुरुवात झाली आहे. राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं असलं तरी, स्थानिक पातळीत परिस्थिती नाजूक आहे. विशेषत: नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येथे युवक राष्ट्रवादीचे 70 % कार्यकर्ते नवी मुंबईतील नेत्यांवर नाराज असल्याचं सांगण्यात येतंय.
याच नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेच युवक जिल्हाध्यक्ष राजेश भोर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचं असल्याची सध्या नवी मुंबईत चर्चा आहे. याविषयी विचारले असता, त्यांनी पक्षाबाबत असलेली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. “राष्ट्रवादीमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होत आहे. महापालिकेसाठी जागावाटप करताना मोठा घोळ करण्यात आला,” असं भोर यांनी म्हटलंय. तसेच पक्षात सुरू असलेली गटबाजी आणि होत असलेली राजकीय कुचंबना याला कंटाळून ते पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहेत, असं म्हटलं जातंय.
दरम्यान, राजेश भोर हे पक्षाच्या राजीनाम्याबाबतची लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच, ते कुठल्या पक्षात जाणार याबाबातही ते पत्रकार परिषदेत सांगणार आहेत. मात्र, महापालिकेच्या तोंडावर राष्ट्रवादीमधून समोर आलेली ही नाराजी सध्या नवी मुंबईच्या राजकीय गोटात चर्चेचा विषय ठरत आहे.
Mouth Cancer | कानांमधून येणाऱ्या विचित्र आवाजाकडे दुर्लक्ष करताय? असू शकतात तोंडाच्या कर्करोगाची लक्षणं!#MouthCancer | #Cancer | #EarPain | #healthcare https://t.co/AFFisjJcxS
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021
इतर बातम्या :
Instagram लाईव्हमध्ये एकाच वेळी चार जणांशी गप्पा मारा, आतापर्यंतचं बेस्ट फीचर सादर
मिटकरी भावा, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार : चित्रा वाघ
(Navi Mumbai NCP leaders and youth district president Rajesh Bhor will resign from party)