नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई एपीएमसी मार्केटमधील धान्य बाजारातून कोकणातील दुर्घटनाग्रस्त आणि पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून 8 ट्रक भरून अन्न धान्य पाठवले. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सभापती अशोक डक, धान्य मार्केट संचालक निलेश विरा उपस्थित होते.
नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने पूरग्रस्त चिपळून महाड येथील नागरिकांच्या मदतीसाठी आज (25 जुलै) मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमधून 8 ट्रक भरलेल्या 80 हजार किलो अन्नपदार्थ रवाना करण्यात आले. यासाठी मुंबई एपीएमसी सभापती अशोक डक यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य मार्केटच्या संचालक निलेश बिरा, ग्रोमाचे सेक्रेटरी अमृतलाल जैन आणि उप सचिव एन. डी. जाधव यांनी मार्केटमध्ये धान्य, डाळी, रवा, पोहा, साखर आणि 4 टन चहा ट्रकमध्ये लोडिंग करून व्यवस्थित करण्यासाठी सहकार्य केले.
कोकणाला मदत…. ठाणे राष्ट्रवादी तर्फे ….
माणुसकीचे नाते ……@paranjpe_anand #Vikramkhamkar #MehbubShaikh#ShanuPathan pic.twitter.com/RT2t5JmepT— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 25, 2021
आजपासून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. दर दिवशी येथून पूरग्रस्तांसाठी काही न काही पाठवण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया अशोक डक यांनी दिली. पूरग्रस्त नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 10 हजार लिटर्स पाण्याचा 1 ट्रक लवकर पाठविण्यात येणार आहे. रेशनिंग, किटस् आणि इतर काही लागणारं धान्य मार्केट व्यापारी असोसिएशनच्या वतीने पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रोमाचे सचिव भीमजी भानुशाली यांनी सांगितली.