नवी मुंबई : (Sharad Pawar on Reserve Bank) रिझर्व्ह बँकेचा (Reserve Bank) सहकारी संस्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन चमत्कारिक झाला आहे. गेल्या काही दिवसात त्यांचे सहकार क्षेत्राला (Cooperative sector) सहकार्य मिळत नाही. रिझर्व्ह बँकेने सहकाराबाबत घेतलेले निर्णय चिंताजनक आहेत, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. गुजरातच्या हातात देशाचे पंतप्रधानपद आणि सहकार मंत्रिपद आहे. महाराष्ट्रामधील सहकार क्षेत्राबाबत (पतपेढी) काही समस्या असतील तर मी तुम्हाला मोदी आणि अमित शाह यांच्याकडे घेवून जाईन. यातून नक्की मार्ग निघेल, चिंता करू नका, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला. शिवकृपा सहकारी पतपेढीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी नवी मुंबईत ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील आणि संस्थांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
संस्थेचे कौतुक
– पतसंस्था कर्ज 1800 कोटींच्या जवळ देतात, परत कर्जफेडीचे प्रमाण हे सहा टक्क्यांच्या आत आहे
– शेतकरी कुटुंबात जन्मलेला व्यक्तीने सहकार संस्था सुरू करून उभारली
– ज्या राज्यांमध्ये सहकार चळवळ उभारली आहे, त्यात महाराष्ट्र आहे. खऱ्या अर्थाने या सहकाराला दिशा कशी मिळेल, याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले
– नवी मुंबईचा महानगर पालिका स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतला तेव्हा मी पहिल्यांदा आलो, त्यावेळी शेती होती. आता मात्र नवीन एकविसाव्या शतकातील शहर उभे राहिले आहे
– पतपेढीची इमारत बघितली. सभागृहाला नाव दिले नाही. या सभागृहाला यशवंत सभागृह नाव द्यावे, अशी सूचना केली
– रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आहे, चिंता वाटणारी ही गोष्ट आहे
– देशात सहकाराची चळवळ महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात आहे
शिवकृपा पतसंस्थेविषयी
– शिवकृपा पतसंस्थेमध्ये तब्बल 3 लाख 52 हजार सभासद असून एकूण 4 हजार कोटीच्या उलाढाल आहे.
– महाराष्ट्रामध्ये ही पतसंस्था डिजिटल आहे आणि 2017,18,19मध्ये सहकारातील उल्लेखनीय कामकाजमुळे दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त आहे
– 1982मध्ये मुंबईत विक्रोळी येथे सुरू झालेल्या या संस्थेच्या सध्या राज्यात 100 शाखा आहेत.
– संस्थांमध्ये एकूण 1500 कर्मचारी आहेत. (शरद पवार यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहा) –
आणखी वाचा :