Navi Mumbai Fire : बाप माणूस ! तिन्ही लेकरांना आगीतून सुखरुप बाहेर काढले, मग कामाचे साहित्य आणायला बेडरुममध्ये गेला अन्…

| Updated on: Jun 27, 2022 | 12:01 AM

शॉर्ट सर्किटने ग्राऊंड प्लस वन घराला लागली. आग लागली तेव्हा घरात राजीव ठाकूर आणि त्यांची तीन मुले होती. त्यांची पत्नी बाहेर गेली होती. घरात आग लागल्याचे लक्षात येताच राजीव ठाकूर यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत आपल्या तिन्ही मुलांना घराबाहेर सुखरुप काढले.

Navi Mumbai Fire : बाप माणूस ! तिन्ही लेकरांना आगीतून सुखरुप बाहेर काढले, मग कामाचे साहित्य आणायला बेडरुममध्ये गेला अन्...
दिल्लीत पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या
Image Credit source: tv9
Follow us on

नवी मुंबई : राहत्या बंगल्यात लागलेल्या आगीतून तिन्ही लेकरांची सुखरुप सुटका (Rescued) केल्यानंतर पित्याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. राजीव ठाकूर (38) असे मयत पित्याचे नाव असून तो अभिनेता असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. आकुर्ली गावात असलेल्या ग्राऊंड प्लस वन घराला ही आग (Fire) लागली. प्रथमदर्शनी ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची माहिती मिळते. दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी आग विझवण्यास अग्नीशमन दलाला यश आले. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठाकूर यांच्या मृत्यूबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रसंगावधान राखत तिन्ही मुलांना सुखरुप बाहेर काढले

शॉर्ट सर्किटने ग्राऊंड प्लस वन घराला लागली. आग लागली तेव्हा घरात राजीव ठाकूर आणि त्यांची तीन मुले होती. त्यांची पत्नी बाहेर गेली होती. घरात आग लागल्याचे लक्षात येताच राजीव ठाकूर यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत आपल्या तिन्ही मुलांना घराबाहेर सुखरुप काढले. त्यानंतर ठाकूर हे पहिल्या माळ्यावरील बेडरुममध्ये आपला लॅपटॉप, स्क्रिप्ट्स, कागदपत्रे इत्यादी साहित्य गोळा करण्यासाठी गेले. मात्र ते बाहेर येऊ शकले नाहीत आणि आगीत अडकले. आगीत गंभीर जखमी झालेल्या राजीव यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरु केले. तीन फायर इंजिन आणि एक पाण्याचा टँकर आग विझवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. अग्नीशमन दलाने दोन तास अथक प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे दिसते. (One died in a fire at a bungalow in Navi Mumbai)

हे सुद्धा वाचा