नवी मुंबई: पाम बीच मार्गावर अक्षर ते एनआरआय सिग्नल दरम्यान वाशी ते बेलापूर मार्गावर (Vashi to Belapur) कारचा भीषण अपघात (Car Accident) झाला. या अपघातात दोघे जण ठार (Both killed) झाले असल्याची माहितीही समोर आली आहे. हा अपघात 4 मे रोजी पहाटे तीन वाजता झाला असून अपघातानंतर या मार्गावर वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. या अपघाता एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
नवी मुंबई पाम बीच येथे भरधाव वेगाने आलेल्या कारने दुभाजक आणि पोलला जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की, कारने दुभाजक आणि पोलला धडक दिल्यानंतर कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
कारचा अपघात झाल्यानंतर कारमधील वाहकाला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. तर कारमधील जखमी झालेल्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
वाहतूक व्यवस्था खोळंबली
पहाटे हा अपघात झाला असल्यामुळे झोपेमुळे हा अपघात झाला आहे का अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. अपघात झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी कारममधील अपघातग्रस्त नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अपघातग्रस्त नेमके कुठले आहेत, त्याची चौकशी सुरु करण्यात आली. जखमीला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
अपघात झाल्यानंतर वाशी ते बेलापूर मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला असला तरी, त्यानंतर बघ्यांकडूनच कार अपघातातील जखमींना मदत करण्यात आली. सध्या या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन, वाहतून व्यवस्थेचे पोलिसांकडून वारंवार वेग मर्यादा आणि वाहतुकीच्या नियमांविषयी सांगण्यात येत असले तरी त्याकडे वाहतूक चालक, वाहक दुर्लक्षित केले जात असल्याचे सांगितले.