नवी मुंबई : मागच्या 2 वर्षाच्या कोरोना काळात सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. गणेशोत्सव काय कुठलेही सण साजरा करता आले नाही. मात्र यंदा करूनच या नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने लोकांची पावलं गणेशोत्सवाच्य खरेदीसाठी बाजाराकडे बोलतान पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंनी बजारपेठे फुलली आहे. गणेशोत्सवासाठी लागाणाऱ्या पूजेच्या साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली. गोकुळाष्टमी पासून पूजेच्या साहित्यांची खरेदी चांगली सुरु झाली आहे. पूजेच्या वस्तू आणि साहित्यात थोडाफार प्रमाणात भाव वाढ सुद्धा झाली आहे. मात्र याचा परिणाम खरेदीवर होणार नाही. तसेच ग्राहकांची संख्या वाढली आहे त्यामुळे यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत व्यवसाय चांगला असेल अशी प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली.
गणेशोत्सव काळात कापूर, कंठी, लाल कपडा रुमाल, अगरबत्ती, धूप, लाकडी पाठ, समई , निरंजन, पितळेचे ताठ, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी या वस्तूंना मोठी मागणी असते.
मागच्या वर्षी तांब्याचा किलोचा भाव 700 रुपये किलो इतका होता, तो आता 1100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर पितळ मागच्या वर्षी 450 रुपये किलो इतके होते ते आता 700 रुपयांपर्यंत पोचलेले आहे. कच्चा माल वाढल्याने ही भाववाढ 20 ते 25 टक्के भाववाढ झाली असल्याचे दुकानदार सांगतात. तांब्याचे भांडे हे पुणे आणि रोहा या ठिकाणाहून विक्री साठी येते तर पितळ हे मुरादाबाद दिल्ली येथून विक्रीसाठी येते.
सण उत्सवात खाद्यपदार्थात लज्जत वाढवणाऱ्या काही साहित्याच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ, तर काहींच्या दरात स्थिरता दिसून आली. प्रमुख साहित्य असलेले बदाम, खारे वआणिसाध्या पिस्ताच्या दरामध्ये 200 ते 400 रुपयांनी वाढ झाली आहे. याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. एकीकडे कोरोनामुळे नागरिकांच्या आर्थिक संकटांमध्ये वाढ होत आहे आणि दुसरीकडे सणांच्या दिवसात गॅस, डिझेल, पेट्रोल याचे दर सातत्याने वाढत आहे. त्यात भर पडली आहे ती सुक्या मेव्याची.
गणपतीमध्ये विविध गोड पदार्थ केले जातात. त्यामध्ये सुक्या मेव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर असतो. त्यामुळे सण साजरे करायचे तरी कसे असा प्रश्न सर्व सामान्यांकडून विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बदाम, पिस्ता यांसारख्या सुक्या मेव्यांच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे.
कापूर – 1000 रू किलो , 250 रुपये 250 ग्राम
कंठी – 40 रुपया पासून 700 रुपया पर्यंत
रुमाल – 20 रुपया पासून 200 पर्यंत
अगरबत्ती – 100 रुपया पासून 1000 पर्यंत
धूप – 400 रुपये किलो
लाकडी पाट – 100 रुपया पासून 1000 रुपयापर्यंत
समई – 600 पासून 30 हजारपर्यंत
पितळेचे ताठ – 100 रुपयांपासून ते 500 , 700 रुपयांपर्यंत
गणेशोत्सवानिमित्त कोकण वासियांसाठी रेल्वेचं मोठं गिफ्ट, वातानुकूलित विशेष गाड्या उपलब्ध होणार https://t.co/a6f5LNEP6s @raosahebdanve @BJP4Maharashtra @MeNarayanRane @NiteshNRane @OfficeofUT @Vinayakrauts #Ganeshotsav #SpecialTrain #Kokan #RaosahebDanve #GaneshFaestival #ACTrain
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 2, 2021
संबंधित बातम्या :
मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार, पण महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…
गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट! श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना यंदाही मुख्य मंदिरातच