नवी मुंबई : एपीएमसीमधील मर्चंट चेंबर या इमारतीमधील एका लाईटच्या दुकानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी वाशी अग्नीशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविताना मोठे अडथळे येत आहेत. या इमारतीत जवळपास 250 दुकान असून आगीच्या धुरामुळे इतर लोकांनादेखील त्रास होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई येथई एपीएमसीमधईल मर्चंट चेंबर इमारतीतील एका इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली. अचानकपणे आग लागल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मर्चंट चेंबर या इमारतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. आग भडकल्यामुळे ही दुकानेदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडीओ :
आगीचा नेमके कारण अजूनतरी स्पष्ट झालेले नाही. मात्र आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जीवाचे रान करत आहेत. तर दुसरीकडे इमारतीच्या बाहेर बघ्यांची मोठी गर्दी झालीय. लोकांच्या गर्दीमुळे बचावकार्य तसेच आग विझविण्यात अडचण येत आहे.
आज बुधवारी लागलेल्या या आगीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही आग अधिक भडकून धुराचे लोट निघत आहेत. यामुळे संपूर्ण इमारतीमधील नागरिकांनी बाहेर धाव घेतलीय. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून बाकीच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम केले जातेय. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आग घटनास्थळी उपलब्ध आहेत.
इतर बातम्या :
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात हस्तक्षेप करा, पडळकरांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
सात दिवसांत 1 हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घट, सरकारच्या निर्णयामुळेच शेतकऱ्यांचा वांदा
सात दिवसांत 1 हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घट, सरकारच्या निर्णयामुळेच शेतकऱ्यांचा वांदा