नवी मुंबई : शहरातील कोरोना लाट सध्या जरी ओसरत असली तरी नवी मुंबई शहरात मागील वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये डेंग्यू तपासणी आणि धूर फवारणी वाढवावी, अशी मागणी नवी मुंबईच्या नागरिकांकडून होत आहे.
गेल्या वर्षी कोरोना आजाराची लाट असताना नवी मुंबईमधील नागरिकांनी आरोग्य विषयक काळजी घेतल्याने मलेरिया आणि डेंग्यू सदृश रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र, आता ‘कोरोना’ची लाट ओसरत असताना पडलेल्या पावसामुळे नवी मुंबईमधील बाजारपेठ, गावठाण आणि झोपडपट्टी भागात पाणी साचत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.
जुलै-2020 च्या अखेरीस नवी मुंबईमध्ये 10 मलेरियाचे रुग्ण, तर डेंग्यू सदृश्य आजाराचे 17 रुग्ण आढळले होते. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. मात्र, यंदा जुलै 2021 अखेरीस 12 मलेरिया आजाराचे रुग्ण, तर डेंग्यू सदृश्य आजाराचे 38 जण आढळले आहेत. त्यातील 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 9 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
एकंदरीत मागील वर्षीपेक्षा यावर्षी डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईमधील सर्व प्रभागात डेंग्यू तपासणी आणि धूर फवारणी वाढवावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
मुंबईकरांवर साथीच्या आजारांचे संकट डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रोचा धोका वाढला!https://t.co/l5AWbpex0A | #Mumbai | #BMC | #Gastro | #Corona | #Dengue | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 4, 2021
संबंधित बातम्या :
नवी मुंबईत 90 केंद्रांवर लसीकरण होणार, 5 दिवसानंतर 5 हजार कोविशिल्ड, 5 हजार कोवॅक्सिन लस प्राप्त