नवी मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सभा आहे. या सभेला मुस्लिमांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी केले आहे. त्यामुळं मुस्लिमांचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांना मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठी मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर कोकणातील मुस्लीम समाजाला आव्हान करत आहेत. खेडमध्ये ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा आहे. मुस्लीम समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे ठाकूर म्हणातात. महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्या सभेला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे ते यावेळी बोलत होते. एक लाख संख्येने मुस्लीम बांधव या सभेसाठी उपस्थित राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भविष्यातदेखील आम्ही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊच, असंही त्यांनी म्हंटलं.
उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. गोळीबार मैदानाच्या सर्कलला हॅलोजन लावण्यात आले आहेत. संपूर्ण सभा ही विद्युत रोषणाई होणार आहे. या सभेमध्ये गुहागर मतदारसंघातील बहुसंख्ये कार्यकर्ते हे राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजयराव कदम हे देखील याच मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांचा गट अधिक सक्षम होणार असल्याची चिन्हं आहेत. शिवाय मुस्लिमांना या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असं आवाहन केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना बळ मिळणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. उद्या 5 मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या तयारीसाठी ठाकरे गट शिवसैनिक सज्ज झाले आहेत. खेड तालुक्यामधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. 30 हजारांहून जास्त कार्यकर्ते या सभेला हजेरी लावण्याचा अंदाज आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर राहतील. म्हणूनच गोळीबार मैदानात ही सभा घेण्यात येत आहे.