Narayan Rane on Uddhav Thackeray : रागावण्यासारखे दिवस राहिलेत काय?, उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंनी डिवचलं

| Updated on: Jul 12, 2022 | 11:13 PM

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे राणे म्हणाले. मंत्रिमंडळ झालंय. ते लवकरच घोषीत केलं जाईल. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. कारण आज ते कोणी नाहीत, असं राणे म्हणालेत.

Narayan Rane on Uddhav Thackeray : रागावण्यासारखे दिवस राहिलेत काय?, उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंनी डिवचलं
उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंनी डिवचलं
Image Credit source: t v 9
Follow us on

नवी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नवी मुंबईत मराठी उद्योजकता दिनी कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या रागावण्याबद्दल विचारण्यात आले. संरक्षण मंत्री (Minister of Defense) राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्याशी बोलताना ते रागावल्याचं सांगण्यात आलं. तेव्हा नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यांच्याकडं रागवण्यासारखे दिवस राहिले नाहीत. ते रागावले ते फक्त त्यांच्या बायकोनेच पाहिलं असावं, असंही राणे म्हणाले. कारण त्यावेळी ते फोनवर बोलत होते. दुसरे कुणी तिथं नसणार. उध्दव ठाकरे कोण आहेत, काय त्यांचं अस्तित्व. त्यांना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत असल्याचं सांगत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची खिल्ली उडवली.

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे राणे म्हणाले. मंत्रिमंडळ झालंय. ते लवकरच घोषीत केलं जाईल. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. कारण आज ते कोणी नाहीत, असं राणे म्हणालेत. मराठी उद्योजकता दिवसाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्यानं ते उपस्थित होते. मनोज भटीर, रामदार माने, अशोक दोगाडे, विनित बनसोडे आदी उपस्थित होते. मराठी उद्योजक प्रचंड संख्येने या सभागृहात होते.

मराठी माणसानं उद्योजक व्हायची हिंमत केली पाहिजे

केंद्रीय मंत्री झाल्यावर एक वर्ष झालंय. सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग हे खात माझ्याकडं आहे. एका उद्योजकाच्या प्रतीक्षेत होतो. पण, याठिकाणी खूप सारे उद्योजक आहेत. हा उपक्रम उपयुक्त आहे. मराठी माणसानं उद्योजक व्हायची हिंमत केली पाहिजे. जे प्रशिक्षण घेतील, त्यांना कामांमध्ये प्राधान्य दिलं जाईल. केलंच पाहिजे हा धर्म आहे. माझ कर्तव्य मी निभावणार. रोज शपथा घेऊन चालत नाही. त्या मनापासून केल्या पाहिजे. मराठी माणसानं अनेक गोष्टी इतर भाषिकांकडून शिकल्या पाहिजे. पैसा मिळवा. मग स्वतंत्र व्यवसाय करा. चेंबूरला व्यवसायिकांचे गुण मी पाहिजे. व्यवसायासाठी गोड बोलता आलं पाहिजे. देशात सहा कोटी तीस लाख उद्योजक आहेत. त्यात मराठीचा टक्का कमी आहे. तो वाढविण गजरचे असल्याचं नारायण राणे कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

हे सुद्धा वाचा