Marathi News Maharashtra Navi mumbai Venkateswara's magnificent temple to be built at Ulwe Node Letter of land required for the temple handed over to Tirupati Devasthanam
उलवे नोडमध्ये उभारणार व्यंकटेश्वराचे भव्य मंदीर; मंदिरासाठी लागणाऱ्या जमीनीचे पत्र तिरुपती देवस्थानाकडे सुपूर्द
नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये तिरुपती देवस्थानाकडून व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून, याबाबतचे पत्र मंत्री आदित्य ठाकरे यांनी देवस्थानाकडे सोपवले.
1 / 4
नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचे पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी देवस्थानाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांच्याकडे तिरुपती येथे जाऊन सुपूर्द केले. प्रारंभी त्यांनी पहाटे व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली, तसेच आपल्यासोबतचे पत्र श्री चरणी अर्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी , देवस्थानाचे सदस्य मिलिंद नार्वेकर, युवा सेनेचे राहुल कनाल, सूरज चव्हाण व देवस्थानाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
2 / 4
तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगळूरू, विशाखापट्टनम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणी करण्यात आली आहे. या धर्तीवर नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती.
3 / 4
तिरुपती देवस्थानाने विनंती केल्यावर सिडको तसेच राज्य शासनाने अतिशय कमी कालावधीत याविषयीचा निर्णय घेऊन जमीन उपलब्ध करून दिली, त्यामुळे बालाजीच्या लाखो भाविकांची मोठी सोय होणार आहे.. जमीन वाटपाचे पत्र देण्यासाठी स्वतः मंत्री आदित्य ठाकरे तिरुपतीला गेल्याने, मंदीर संस्थानाच्या वतीने त्यांचे आभार माणण्यात आले आहेत.
4 / 4
नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वराचे मंदीर भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगार संधी निर्माण होतील. या देवस्थानामार्फत या परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सर्व बाबींचा विचार करुन एक विशेष बाब म्हणून हा भूखंड उपलब्ध करुन देण्यात आला आहे.