Big News: नवाब मलिकांना राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या खात्याची जबाबदारी कुणाकडे? दोन नावं चर्चेत

| Updated on: Feb 23, 2022 | 6:22 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. मलिकांच्या खात्यासाठी राष्ट्रवादीकडून दोन नावं चर्चेत आहेत.

Big News: नवाब मलिकांना राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या खात्याची जबाबदारी कुणाकडे? दोन नावं चर्चेत
पवारांचं बैठकसत्र सुरू
Follow us on

मुंबई : ईडीने (ED) नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. नवाब मलिक यांना ed ने अटक केलायंनातर त्यांना केबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत.असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटातील हलचालीही वाढल्या आहेत. जर मलिकांना राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या खात्याची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? असा सवालही राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. मलिकांच्या खात्यासाठी राष्ट्रवादीकडून दोन नावं चर्चेत आहेत.

चर्चेतली दोन नावं कोणती?

आधी सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर गृहमंत्रिपदाची माळ दिलीप वळसे पाटलांच्या गळ्यात पडली. आता नवाब मलिकांना राजीनामा द्यावा लागल्यास अल्पसंख्याक मंत्रालयासाठी दोन नावं चर्चेत आहेत. त्यात पहिलं नावं आहे राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांचे आणि दुसरं नाव आहे हसन मुश्रीफ यांचं. जितेंद्र आव्हाड सध्या गृहनिर्माण मंत्री आहेत तर हसन मुश्रीफ सध्या ग्रामविकास मंत्रालयाची धुरा संभाळत आहेत. मात्र मलिकांनी राजीनामा दिल्यास अल्पसंख्याक खात्याचा पदभार या दोन्ही नेत्यांपैकी एकाकडे दिला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र हे चित्र शरद पवार काय निर्णय घेणार? यानंतरच स्पष्ट होईल. मात्र सध्या महाविकास आघाडीच्या गोटातील हलचालींना मोठा वेग आलाय.

भाजपचा आक्रमक पवित्रा

एका पाठोपाठ एका मंत्र्यांच्या आत जाण्याने आणि महाविकास आघाडीती राजनामा सत्राने भाजप महाविकास आघाडीला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील एक मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी राजीनामा द्यावा लागला, एक आत आहेत, एका नेत्याचा अनधिकृत बंगला पाडण्यात आला, एका नेत्याचे अनधिकृत रिसॉर्ट आहे, एका मंत्र्याला दोन पत्नी आहेत. किती मोठी यादी आहे. काय चाललंय हे? कोलमडले आहे सगळं, अशी खोचक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तर मलिक यांच्या अटकेनंतर राज्यात अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी फटाके फोडून जल्लोष केलाय. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि ईडीविरोधात जोरदार आंदोलन केले आहे.

Nawab Malik Arrested : शरद पवारांच्या उपस्थितीत ‘सिल्व्हर ओक’वर खलबतं, काँग्रेस नेतेही पवारांच्या भेटीला! मलिकांबाबत कोणता निर्णय?

मलिकांच्या अटकेनंतर नितेश राणेंकडून डुकराचा फोटो पोस्ट, म्हणतात पैहचान कौन?

Nawab Malik Arrest : ईडीला सरकार बनवायची घाई लागली असेल तर शिवाजी पार्कात या! यशोमती ठाकूर यांचं थेट आव्हान