मुंबई : देशात सध्या कर्नाटकातील हिजाब (Hijab) प्रकरणावरून प्रचंड राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेकांनी त्या घोषणाबाजी करणाऱ्या मुलीला समर्थन दिले आहे, तर दुसरीकडे विरोध करणारी मंडळीही दिवसेंदिवस वाढत आहे. कर्नाटकमध्ये (Karnataka Hijab) सध्या यावरून ताणावाचे वातावरण आहे. कर्नाटक सरकारला तीन दिवस शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय या प्रकारामुळे घ्यावा लागला आहे. यावरूनच आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट पंतप्रधान मोदींना (Pm Modi) टार्गेट केलंय. देशामध्ये कुणी काय खायचं… कुणी कसे कपडे वापरायचे हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधानांना ट्वीट करुन केला आहे. राज्यातल्या राजकारणातही या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटत आहेत. सोशल मीडियावरही समर्थन देणारे आणि विरोध करणारे दोन्ही हॅश्टॅम सध्या ट्रेंड करत आहेत. काही जण दोन्ही बाजूंवर जोरदार टीका करत आहेत.
नवाब मलिकांचा सवाल काय?
देश में कौन क्या खाए गा , क़ौन क्या पहने गा अब भाजपा और संघपरिवार तय करेगा ।यह नागरिकों के मौलिक अधिकरों का हनन है, मुस्लिम लड़कियाँ इस्कूल और कोलेज़ जा रही हैं ,पढ़ रही हैं , क्या यह परेशानी है, बेटी पढ़ाओ नारे का क्या हुआ ।
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 9, 2022
नवाब मलिक यांनी मोदींना उद्देशून ट्विट करत म्हटले आहे की, मुस्लिम मुली हायस्कूल आणि महाविद्यालयात जाऊन शिकत आहेत ही समस्या आहे का? मुली शिकवा या घोषणेचं काय झालं? असाही सवाल नवाब मलिक यांनी ट्वीट करुन पंतप्रधानांना विचारला आहे. भाजप आणि संघपरिवाराकडून नागरिकांच्या मुलभूत अधिकारांची ही सरळसरळ पायमल्ली आहे असेही नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. कर्नाटकात हिजाब विरद्ध भगवा असा संघर्ष पेटलेला असतानाच आता या विद्यार्थीनीला एकानं चक्क पाच लाख रुपयांचं बक्षिस दिलंय. जमीयत उलेमा-ए-हिंद या संस्थेकडून हे बक्षिस जाहीर करण्यात आलंय. जय श्री रामचा नारा देणाऱ्या या विद्यार्थीनीचं नाव मुस्कान खान असं आहे. तिच्या बहादुरीवर खूश होऊन जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेच्या वतीनं मुस्कानला पाच लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलंय. तसंच तिच्या उज्ज्वल भविष्यसाठीही तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तिला प्रोत्साहित करण्यासाठी पाच लाख रुपयांचं बक्षिस देत असल्याचं या संघटनेनं म्हटलंय.
प्रियंका गांधी यांचंही ट्विट
Whether it is a bikini, a ghoonghat, a pair of jeans or a hijab, it is a woman’s right to decide what she wants to wear.
This right is GUARANTEED by the Indian constitution. Stop harassing women. #ladkihoonladsaktihoon
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 9, 2022
बिकिनी असो की घुंगट, जीन्स असो की हिजाब, काय परिधान करायचं, हे ठरण्याचा अधिकार स्त्रीला आहे. संविधानानं दिलेला हा ‘गॅरंटीड’ अधिकार आहे. त्यामुळे महिलांचं शोषण करणं थांबवा, असं ट्वीटर प्रियंका गांधी वाड्रा यांनी केला आहे. आज सकाळी त्यांनी याबाबत ट्वीट केलाय. कर्नाटकातील हिजाब विरुद्ध भगवा असा वाद पेटलाय. त्याचा व्हिडीओही मंगळवारी तुफान व्हायरल झाला होता. मुस्कान खान या हिजाब परिधान केलेल्या एका विद्यार्थीनीली हिजाबविरोधी भूमिका घेणाऱ्या तरुणांनी घेराव घातला होता. कॉलेजात प्रवेश करताना झालेला हा सगळा राडा मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आता प्रियंका गांधी यांनीही याबाबात ट्वीट करत मुलींच्या सुरु असलेल्या शोषणावरुन आवाज उठवला आहे. दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या या ट्वीटनंतर आता ट्विटरवर बिकिनी हा हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला आहे.