कुठे भ्रष्टाचार करायचा, याचं तारतम्यही सरकारला राहिलेलं नाही, शरद पवारांचा संताप

| Updated on: Aug 28, 2024 | 2:18 PM

कुठे भ्रष्टाचार करायचा याचं तारतम्यही सरकारला राहिलेलं नाही. सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याने आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. राज्यात भ्रष्टाचार टोकाला पोहोचलाय अशा शब्दांत सरकारवर ताशेरे ओढत शरद पवार यांनी संताप व्यक्त केला.

कुठे भ्रष्टाचार करायचा, याचं तारतम्यही सरकारला राहिलेलं नाही, शरद पवारांचा संताप
Follow us on

कुठे भ्रष्टाचार करायचा याचं तारतम्यही सरकारला राहिलेलं नाही. सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याने आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. राज्यात भ्रष्टाचार टोकाला पोहोचलाय अशा शब्दांत सरकारवर ताशेरे ओढत शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असणारा पूर्णाकृती पुतळा कोसळ्यानंतर राज्यभरात संतपाचे वातावरण असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत या मु्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे.’मातोश्री’मध्ये मविआ नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली . शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला.

आज कोणी म्हणतंय वाऱ्याचा वेग होता. भ्रष्टाचार केला. त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे. कुठे भ्रष्टाचाराची भूमिका घेऊ नये याचं तारतम्यही यांना नाही. त्यामुळे लोकांची तीव्र भावना आहे. त्यासाठीच आम्ही लोकांना आवाहन करत आहोत. येत्या रविवारी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल,असे त्यांनी नमूद केलं.

यात राजकारण काय ?

बदलापूर घटनेवरून विरोधक राजकारण करत असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली. त्यावरही शरद पवार यांनी ताशेरे ओढले. ‘ यात राजकारण काय ? शिवाजी महाराजांच्या काळात लोकांना एक गोष्ट भावली. त्यांच्या काळात एका महिलेवर अत्याचार झाला. ही तक्रार महाराजांकडे आली. त्यानंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात कलम केले. अशी प्रकारची नीती त्यांनी जनतेसमोर ठेवली. एका भगिनीला त्रास दिल्यावर त्यांनी सख्त निर्णय घेतला ‘ असे पवार म्हणाले.

आपलं नौदल एवढं पोकळ आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल

मालवणात राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. मविआही यावरून आक्रमक झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज सरकारला धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले. गुन्हा दाखल करणार असाल तर गुन्हा घडला हे मान्य आहे. मग गुन्हेगार कोण. मोदी आले त्यांच्या हस्ते अनावर झालं. त्यांचा संबंध आला. आपलं नौदल एवढं पोकळ आहे का. ते समुद्राशीच खेळत असतात. ही जबाबदारी नौदलावर टाकून मोकळे होणार आहे का. किती वेगाने वारे वाहणार हे नौदलाला माहीत नव्हतं का? निवडणूका होत्या. कोकण जिंकायचं यासाठी हा घाट घातला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं. शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला. तो अजूनही आहे. तेव्हा तंत्रज्ञान प्रगत होतं. आता नाही का?” असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.