महाराष्ट्रातील कांदा निर्यात शुल्क वाढत असल्याने महाराष्ट्रातील कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेला नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले. 8 टक्के एवढाही कांदा बाहेर देशी गेला नाही, त्यमुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना बसला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असल्यानेच धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिरुरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. जुन्नरमध्ये 200 पेक्षा जास्त ट्रॅक्टर या मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी ट्रक्टर चालवत त्याचे नेतृत्व केले. शिंदे सरकार जे अस्तित्वात आले आहे, त्या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.