सोलापूर : राज्यातील 34 जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत असतांना काही ग्रामपंचायत निवडणुकीची विशेष चर्चा होत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यातील सात हजार 135 ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले आहे. त्यात विशेष म्हणजे थेट सरपंच पदाची निवडणूक असल्याने मोठी रंगत ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळाली आहे. त्यात विशेष म्हणजे सोलापूर मधील एक ग्रामपंचायत चर्चेत आली आहे. गावात जो पर्यन्त राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचा उमेदवार सरपंच होत नाही तोपर्यंत दाढी करणार नाही असा पण एका कार्यकर्त्यांनी केला होता. पंढरपूर तालुक्यातील आजोती गावाची ही घटना आहे. आजोती गावचे नागरिक आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अमरजीत पवार यांनी हा पण केला होता. राष्ट्रवादीचा सरपंच व्हावा यासाठी आमर्जीत पवार ही आग्रही होते, त्यासाठी दिवसरात्र ते मेहनत करत होते.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आजोती गाव संपूर्ण राज्यात चर्चेत आले आहे, त्याचे कारण म्हणजे अमरजीत पवार या कार्यकर्त्यांच्या दाढी आणि केसाने.
अमरजीत पवार यांनी जो पर्यन्त गावात राष्ट्रवादीचा सरपंच होत नाही तोपर्यंत दाढी आणि कटींग करणार नाही असा पण केला होता.
तीन वर्षापूर्वी अमरजीत पवार यांनी पण केला होता, तीन वर्षांनंतर अमरजीत पवार यांचा हा पण सुटणार आहे.
आरती पवार या राष्ट्रवादीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत उभ्या होत्या आणि त्या बहुमताने निवडून आल्या आहे. त्यानंतर अमरजीत पवार यांनी पुष्पा चित्रपटातील स्टाईल करून विजयी जल्लोष केला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने केलेला पण चर्चेत आला आहे. पंढरपूर येथील आजोतीच्या सरपंच पदाची निवडणूक यानिमित्ताने राज्यभर चर्चिली जाऊ लागली आहे.