Chaggan Bhujbal : आरक्षणाने मिळालं म्हणजे घराला सोन्याचे कौल लागले, असं होत नाही – छगन भुजबळ स्पष्टच बोलले

| Updated on: Dec 18, 2024 | 2:32 PM

आरक्षण काय आहे, कशासाठी आहे. आरक्षणाने एका वर्षात पाच वर्षात सर्व प्रश्न सुटत नाही. आरक्षण दिलं म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं नाही. आरक्षण दिलं म्हणजे घरावर सोन्याचे कोल दिले, असा भ्रम करून दिला, पण तसं नाही, असं भुजबळ स्पष्टचं बोल

Chaggan Bhujbal : आरक्षणाने मिळालं म्हणजे घराला सोन्याचे कौल लागले, असं होत नाही  - छगन भुजबळ स्पष्टच बोलले
Follow us on

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कडाडून विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर आरक्षणावरून आपली भूमिका मांडली आहे. नाशिकमध्ये समता परिषदेच्या मेळाव्यात ते या मुद्यावर स्पष्ट बोलले. आरक्षण काय आहे, कशासाठी आहे. आरक्षणाने एका वर्षात पाच वर्षात सर्व प्रश्न सुटत नाही. आरक्षण दिलं म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं नाही. आरक्षण दिलं म्हणजे घरावर सोन्याचे कोल दिले, असा भ्रम करून दिला, पण तसं नाही, असं भुजबळ स्पष्टचं बोलले.

आपल्यासोबत दलित, मागासवर्गीय, मुस्लिम आहेत. त्याप्रमाणे मराठा समाजाच्या कार्यकर्तेसुद्धा आहेत. मतदारसंघात माझ्या निवडणुकीचं सारथ्य मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलं. सगळी माणसं आपल्यासोबत आहेत.
महात्मा फुल्यांना ब्राह्मणांनी मदत केली. एक-दोन नाही अनेक ब्राह्मणांनी मदतच केली, पण काही लोकांची मनोवृत्ती ती कोती असते, अतिशय छोटी असते. पण थोडेतरी लोक त्यात समजदार असतात, काय चूक आहे ते त्यांना समजतं. महिलांच्या शिक्षणाला , मुलींच्या शाळेला विरोध करणारे तुमच्या आमच्यातीलही होते. आपल्याला शाळेला जागा देणारे ब्राह्मण समाजाचेही होते. त्यामुळे आपले दुश्मन सर्वच नाही. आमच्या विरोधात, आपल्याला संपवायला निघाले आहेत त्यांना आपला विरोध आहे. ज्यांना समतेचं चक्र उलटं फिरवायचं आहे, त्यांना विरोध आहे, असे भुजबळांनी स्पष्ट केलं .

आरक्षण मिळालं म्हणजे घरावर सोन्याचे कौल लागले असं नाही

जात पात नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेवटी आरक्षण, आरक्षण म्हणजे तरी काय, कशासाछी आहे ? मी तर किती वेळा सांगितलंय, आरक्षणाने एका दिवसात, एका वर्षात, पाच वर्षांत सगळे प्रश्न सुटत नाहीत.
असे सगळे प्रश्न सुटले असते तर दलित, आदिवासींना मोठ्या प्रमाणात आरक्षण आहेच. कितीतरी दलित समाजाचे, आदिवासी समाजातील एसपी, कलेक्टर सापडतील. पण झोपडपट्ट्यात गेले तर दलित आणि आदिवसीच सापडतात. पण असा एक भ्रम करून दिला आहे की आरक्षण मिळालं की सोन्याचे कौल आपल्या घरावर बसणार, पण असं होतं नाही.