राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बड्या नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेवर गंभीर आरोप, शिंदे ही… मला मार्ग सापडेना…

| Updated on: Nov 16, 2022 | 5:00 PM

उद्धव ठाकरे भेटत नाही, अशी तक्रार शिंदे गटातील नेते करत होते. मात्र मला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटच देत नाहीये.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बड्या नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेवर गंभीर आरोप, शिंदे ही... मला मार्ग सापडेना...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : उद्धव ठाकरे आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना भेटत नव्हते असा आरोप करत शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि आमदारांनी राज्यभर रान पेटवले होते, त्यामुले उद्धव ठाकरे यांच्यावर विविध प्रकारची टीका देखील झाली होती. मात्र, त्यांनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेला आरोप उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच शिंदे यांनाही लागू होत असल्याची एक प्रकारे तुलना केली आहे. शिंदे गटाचे आमदार उद्धव ठाकरे भेटत नाही म्हणून आरोप करत होते, पण मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देत नाही असा दावा केला आहे. इतकंच काय तर मी कॉल केल्यावर कॉल ही घेत नाही, याशिवाय मॅसेजला कधीतरी रिप्लाय करतात असं भुजबळ यांनी म्हंटले आहे. एकूणच भुजबळ यांनी केलेला खुलासा बघता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे भेटत नाही, अशी तक्रार शिंदे गटातील नेते करत होते. मात्र मला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटच देत नाहीये.

ते माझ्या फोनलाही रिस्पॉन्स देत नाहीत. एखादवेळेस मॅसेजला रिप्लाय देतात. त्यामुळे त्यांना भेटावे कसे, याचा मार्गच मला सापडत नाहीये, असा टोला छगन भुजबळांनी लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही भेटीवरुन आता धुसफूस समोर येऊ लागली आहे, ही धुसफूस विरोधकांची असली तरी प्रत्यक्षात अनेक आमदार हे भेटीवरुन नाराजी व्यक्त करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत भेटीचा मार्ग सापडत नाही म्हणून एकप्रकारे भुजबळ यांनी टोला लावला आहे.

फडणवीस आणि शिंदे यांच्यातील भेटीबाबत भुजबळ यांनी हा टोला लगावला असून भेटीचा मार्ग सापडत नाही म्हणून केलेल्या टीकेची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.