विल पॉवर असल्यास आपण… एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली इच्छा

| Updated on: Nov 19, 2023 | 1:23 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अलिकडेच हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुन सूत्रे हलवित खडसे यांनी एअर एम्ब्युलन्स पाठवून त्यांना वैद्यकीय मदत पोहचली होती. या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या तत्परतेचे एकनाथ खडसे यांनी आभार मानत देवदूत बनून आल्याबद्दल त्यांचे आभार मानले होते. त्यांच्या तत्परतेने आपण वाचल्याचे खडसे यांनी म्हटले होते.

विल पॉवर असल्यास आपण... एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली इच्छा
eknath khadse
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव | 19 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे हृदयविकाराच्या झटक्यातून वेळीच मदत मिळाल्याने बचावल्यानंतर मिडीयाशी बोलले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळीच एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था केल्याने खडसे यांचे प्राण वाचण्यास मदत झाली होती. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही मानले होते. आता त्यांनी आपल्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोन आल्याचे म्हटले आहे. विल पॉवर मजबूत असेल तर माणूस काही करु शकतो, आपण लोकसभेलाही सामोरे जायला तयार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर आपण वाचू की नाही याची खात्री नव्हती, मात्री मी मुक्ताईच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने एवढ्या संकटातून वाचल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. आपल्या फडणवीस यांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला. माझ्या प्रकृती काळजी घेणारे भाजपप्रेमी आपल्याला कमळ फूल देऊन शुभेच्छा देत आहेत. कमळ हे फूल म्हणून आपण स्वीकारत असल्याचेही खडसे यांनी सांगितले.  उत्खनन प्रकरणात 137 कोटी दंडाची नोटीस बजावणे आणि त्रास देणे हे राजकीय हेतूपोटीच सुरु आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा विकास हा फक्त ठेकेदारांपुरता मर्यादित आहे, खरा विकास शून्य असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नको

आरक्षणाबाबत आमची पूर्वीपासून एकच भूमिका आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले जावे. संध्या जे एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप करुन समाजातील स्वास्थ्य बिघडत चालल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. मोठ्या माणसांवर आरोप केले की प्रसिद्धी मिळते. आतापर्यंत अंजली दमानिया झोपल्या होत्या, आता निद्रेमधून जाग्या झाल्या म्हणून त्या छगन भुजबळांवर आरोप करीत असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. मी क्रिकट प्रेमी आहे. त्यामुळे मला वाटतं की भारताचा विजय नक्की होईल असेही एका प्रश्नाला उत्तर देताना खडसे यांनी सांगितले.