मुक्ताईनगर, जळगाव : राज्यातील बहुतांश ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. राज्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. अनेक नेत्यांना मोठा धक्का बसला आहे तर काहींना आपला गड राखण्यात यश आले आहे. एकूणच राज्यातील चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कोणी बाजी मारली याकडे अनेकांचं लक्ष लागून होतं. जळगावमधील राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडे असेच लक्ष लागून होते. त्याचे कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथ खडसे यांच्याकडे जिल्हा दूध संघाच्या चाव्या होत्या, एकनाथ खडसे यांनी निर्विवाद सत्ता आपल्याकडे कायम ठेवली होती. अशातच ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल तयार करण्यात आले होते.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा दबदबा कायम असल्याचे दिसून आले आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघातील 7 ग्रामपंचायत पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय झाला असून खडसे यांनी हे पॅनल तयार केले होते.
मुक्ताईनगर तालुक्यात एक कु-हा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात तर बोदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय
एकनाथ खडसेंनी यांची जिल्हा दूध संघात मोठा पराभवानंतर ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात खडसे यांना यश आले आहे.
एकनाथ खडसे यांनी मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपाला मोठा धक्का दिला असून राष्ट्रवादीच्या ताब्यात ग्रामपंचायत खेचून आणण्यासाठी खडसे यांना यश आले आहे.
जिल्हा दूध संघात एकनाथ खडसे यांचा मोठा पराभव झाल्यानंतर खडसे यांचा दबदबा कमी झाल्याच्या चर्चा होत्या त्यात खडसे यांनी ग्रामपंचायत ताब्यात घेऊन आपला दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले आहे.