मुंबई : गॅस सिलेंडरच्या किंमतीत कमालीची वाढ झाल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर शेणाच्या गोवऱ्यांनी चूल पेटवून तीव्र आंदोलन करत निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वाशिम येथे रस्त्यावर उतरून, चूलींवर भाकऱ्या भाजून मोदी सरकारचा निषेध केला. यापुढील आंदोलन पेट्रोल पंपांवरील उज्वला गॅस योजनेबाबत लावलेल्या मोदींच्या होर्डिंग्जविरोधात असेल, असा इशारा चाकणकर यांनी यावेळी दिला.
दरम्यान, केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी साहेबांच्या दाढीसोबत सुरु असलेली गॅस दरवाढीची स्पर्धा थांबवावी, असा इशाराही चाकणकर यांनी यावेळी दिला, “गॅस दरवाढीच्या विरोधात दिवसेंदिवस वाढ होत असून त्याबाबत केंद्र सरकार अजिबात संवेदनशील नाही. ही योजना 5 कोटी महिलांपर्यंत पोहोचवण्याची योजना होती. ती पोहोचली की नाही हे माहीत नाही, पण महिलांना मात्र या दरवाढीने मोदी सरकारने रडवले आहे. या गॅस दरवाढीमुळे महिला वर्गाचे बजेट कोसळले आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने महिलांसाठी कोणत्याही योजना आणल्या नाहीत. त्यामुळे हे सरकार महिलांच्या विरोधात आहे. शिवाय ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे, तिथे महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. तसेच तेथील सरकार आरोपींना पाठिशी घालण्याचे धोरण राबवत आहे”, असा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
महिलांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातीलच काय पण इतर राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे महिलांच्या बाबतीत सरकार अजिबात संवेदनशील नाही तर महिलांच्या विरोधात आहे. यापूर्वी चूल पेटवा आंदोलन केले, त्याबाबतदेखील गंभीर नाही. याउलट आमच्या माता-भगिनींच्या कराच्या पैशातून पेट्रोल पंपांवर होर्डिंग्ज लावून जाहिरात करत आहेत, त्यामुळेच या होडिंग्जच्या विरोधात यापुढील काळात आंदोलन करण्याचा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
शाहाची तानाशाही नही चलेगी… नही चलेगी.., आवाज दो हम एक है…, जय जवान जय किसान…, भारत माता की जय…, किसानों के अधिकारमे राष्ट्रवादी मैदान मे… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज कुर्ला परिसर दणाणून सोडला. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज कुर्ला येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते आणि या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला होता. आजच्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सहभागी झाले होतेच शिवाय मुंबईभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवाब मलिक यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. भाजप शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष असल्याचे सांगतानाच मोठ्या उद्योगपतींना कृषी क्षेत्रात घुसवण्याचा डाव असल्याचा थेट आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला. सरकारला मॉडर्न कायदा आणण्याचा अधिकार असताना भाजप सरकारने डायरेक्ट कायदाच बनवला आहे. या तीन कृषी कायद्यांविरोधात गेले चार महिने शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणताता भाजप सरकारला शरम वाटली पाहिजे, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला. लाल किल्ल्यावर जो प्रकार घडला त्याला शेतकरी नाही तर भाजप जबाबदार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा
भाजपनं उंटावरुन शेळ्या राखणं बंद करावं, प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका
‘तुम कुस्ती करो, हम कपडे संभालते हैं!’ असलं काही करु नका, अजितदादांचा मोलाचा सल्ला
इंदापुरात अजितदादा म्हणाले, तर समोरच्याचं डिपॉजिट जप्त झालं असतं !