योगेश बोरसे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे (NCP) घडयाळ बंद पाडू, ते ही बारामती (Baramati) मधूनच बंद पाडावे लागेल. त्यांना कळणार सुद्धा नाही असे म्हणत बावनकुळे यांनी प्रवेशाचे बॉम्बस्फोट अजून फुटणार आहे असे म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली होती. बावनकुळे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रावादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी दिले आहे. घडयाळ पाडणे कुणाची जहागिरी नाही, या जन्मी काय पुढच्या सात जन्मी घडयाळ बंद पाडणे शक्य नाही असे म्हणत पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. – हिटलरशाहीने आणि यंत्रणेचा दबाव आणून तुम्ही सत्तेत आला आहात, राष्ट्रवादीचे घड्याळ बंद करण्याची कुणाच्या बापाची जहागिरी नाहीये अशी जहरी टीका देखील रूपाली पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केली आहे.
घडयाळ बारामतीत बंद पाडले पाहिजे, कॉँग्रेसचा पंजा साकुलीत थांबविला पाहिजे आणि कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने हातात घेतलेली मशाल जी उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे ती पेटली तरी समुद्राचे पाणी आणून कशी विझवायची हेच आमचे टार्गेट.
याशिवाय प्रवेशाचे असे बॉम्ब फुटणार आहे जे की अजित पवार आणि जयंत पाटील यांना देखील कळणार नाही, त्यामुळे त्यांना आत्ता मी काही बोलणार नाही असे म्हणत बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या याच टीकेवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रत्युत्तर देत जहरी टीका केली आहे. रूपाली पाटील यांनी थेट घडयाळ बंद पाडणे कुणाच्या बापाची जहागिरी नाही असे म्हंटले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गटात आणि भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात प्रवेश सोहळे होत असून आणखी प्रवेश येत्या काळात होण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील पहिल्या फळीतील नेते सुनील तटकरे यांच्या पुतण्याने हाती बांधलेले शिवबंधन सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्यातच सुनील तटकरे यांनी देखील शिंदे गटाचे मंत्री सामंत यांच्याशी बंददाराआड चर्चा केली आहे.
दरम्यान, राज्यात सत्तांतर होताच अनेक नेत्यांची प्रवेशाबाबतची हालचाल सुरू होत असते, तसेच आताही दिसून येत आहे.