मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याची सीआयडीकडून चौकशी

| Updated on: Dec 29, 2024 | 3:56 PM

मोठी बातमी समोर येत आहे, संतोष देशमुख हत्याप्रकरणात आता सीआयडीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षांसह आणखी तीन जणांची चौकशी करण्यात येत आहे.

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याची सीआयडीकडून चौकशी
Follow us on

वीस दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाहीये. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली, वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी सीआयडीकडून वाल्मिकी कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली होती, आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आता सीआयडीकडून वाल्मिकी कराड यांच्या पत्नीनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांची देखील चौकशी करण्यात येत आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात संध्या सोनावणे यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संध्या सोनावणे यांच्यासह आणखी तीन जणांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

चौकशीचं कारण स्पष्ट नाही 

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे, त्यांच्यासह आणखी तीन जणांची चौकशी सुरू आहे, मात्र सीआयडीकडून या चौकशीबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे, चौकशी नेमकी कशासंदर्भात केली जात आहे, हे अद्याप समोर आलेलं नाहीये.

वातावरण तापलं 

संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता वीस दिवस उलटले आहेत, मात्र या प्रकरणातील काही आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये, तामुळे राज्यभरात वातावरण तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्व पक्षांचे नेते सहभागी झाले होते. उर्वरीत आरोपींना तातडीनं अटक करावी, तसेच जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, वाल्मिकी कराड यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.