कोल्हापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल मुंबईच्या (mumbai) शिवाजी पार्कात केलेल्या भाषणाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी त्यांच्या खास शैलीत खिल्ली उडवली. कालच्या भाषणाने एक गोष्ट चांगली झाली. ते बरेच वर्ष भूमिगत झाले होते. त्यांचा काहीच अंदाड कुणालाच येत नव्हता. पण कालच्या भाषणामुळे ठाकरे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात यायाल उत्सुक आहेत हे दिसून आलं. त्यांचं वैशिष्ट्ये सांगायचं म्हणजे, ते दोन चार महिने भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन चार महिने ते काय करतात ते मला माहीत नाही, असा चिमटा शरद पवार यांनी राज ठाकरेंना काढला. या पूर्वी ते मोदींच्या संदर्भातील काय काय भूमिका मांडत होते ते महाराष्ट्राने पाहिलं. त्यात काही तरी बदल झालेला दिसतो. हा गुणात्मक बदल त्यांच्यात झालेला दिसतो. उद्या काय होईल सांगता येत नाही. पण आज मोदींना अनुकूल अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे वारंवार दिसून आले आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.
शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि अन्य निवडणुकांमध्ये राज ठाकरेंचा पक्ष किती प्रभावी आहे हे मी सांगू शकत नाही. मागच्या निवडणुकीचे आकडे सर्वांना माहीत आहे. त्यांचे आकडे अत्यंत मर्यादित आहे. त्यांचा आकडा मोजायचाच असेल तर हाताच्या बोटापलिकडे जात नाही. अशा प्रकारचा लोकांचा त्यांना मिळालेला पाठिंबा दर्शवितो. त्यानंतर ते काही कर्तृत्व दाखवतील हे सांगू शकत नाही, असा चिमटाही पवार यांनी काढला.
देशासमोर मुख्य प्रश्न दोन चार आहेत. एक महागाईचा आहे. पेट्रोल डिझेलचा प्रश्न आहे. यापूर्वी किंमती वाढल्या नाही असं म्हणत नाही. पण रोज किंमती वाढतात हे कधी पाहायला मिळालं नाही. आज पेट्रोल डिझेलचे दर रोज वाढत आहेत. मला एकट्याला त्रास होतो असं नाही. भाजीपाला, अन्नधान्याचा खर्च वाढतो. प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढतो. त्याची किंमत सामान्य माणसाला चुकवावी लागते. सरकार त्याकडे ढुंकून पाहत नाही. मला आठवतं मी एकेकाळी मी केंद्राच्या सरकारमध्ये होतो. कांद्याच्या किंमती वाढल्या होत्या. माझा दृष्टीकोण वेगळा होता. शेतकऱ्याला दोन पैसे मिळत असतील तर मी त्याला विरोध करत नाही, असं मी स्पष्ट केलं होतं. लोकसभेतील माझं हे विधान ऐकल्यानंतर भाजपवाले दुसऱ्या दिवशी कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले आणि त्या ठिकाणी आम्हाला महागाईवर तडजोड करायची नाही असं त्यांनी सांगितलं. ती भूमिका आज सत्तेवर आल्यावर का बदलली? आज त्या सर्व प्रश्नाकडे ते अजिबात बघायला तयार नाहीत, असं ते म्हणाले.
महागाईमुळे लोकांना त्यांच्या यातना होत आहेत. त्यामुळे महागाईचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी भूमिका आणि वक्तव्य सत्ताधाऱ्यांनी केली आहे. समाज एकसंघ ठेवला पाहिजे, देश पुढे न्यायचा असेल माणसा माणसात, जातीजातीत, धर्माधर्मात एकवाक्यता एकसंघता हवी. फूट नको. आपण भारतीय आहोत ही भावना असली पाहिजे. पण आपण भारतीय आहोत ही भावना रुजवण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. देशाच्या दृष्टीने ते घातक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही – जितेंद्र आव्हाड
Kisan Credit Card : कार्डमुळे वाढणार शेतकऱ्यांचे Credit, कार्ड नेमके मिळवायचे कसे ? घ्या जाणून