अमोल मिटकरी यांची अभिवादन करणारी गुढी; नेमकं वेगळं पण काय जपलंय…

| Updated on: Mar 22, 2023 | 11:37 PM

अमोल मिटकरी यांनी उभा केलेल्या गुढीची आज दिवसभर चर्चा करण्यात येत होती. अमोल मिटकरी यांनी महापुरुषांना अभिवादन करणारी गुढी उभी केल्याने त्यांच्या गुढीचा चर्चा झाली आहे.

अमोल मिटकरी यांची अभिवादन करणारी गुढी; नेमकं वेगळं पण काय जपलंय...
Follow us on

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी नेहमीच त्यांच्या बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. इतिहासातील अनेक घटना सांगत असताना त्यांच्याकडून सातत्याने संदर्भासह स्पष्टीकरण देऊन ते नेहमीच इतिहासााची मांडणी करत असतात. आज आमदार अमोल मिटकरी यांनी गुढीपाडवा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा न करता त्यांनी वेगळ्या पद्धतीने गुढी उभी करून एक वेगळेपण जपले आहे. अमोल मिटकरी यांच्या घरी गुडी न उभारता भगवा ध्वज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो, संत तुकाराम महाराज यांची गाथा ठेवून त्यांनी शंभू राजांना अभिवादन केले आहे.

आज राज्यात सगळीकडे गुढी उभारून मराठी नववर्ष साजरे केले जाते. पण अकोल्यामधील राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी पारंपरिक गुढी उभा न करता त्यांनी भगवा ध्वज आणि संभाजी राजांचा फोटो सह तुकाराम महाराजांची गाथा ठेवून महापुरुषांना अभिवादन केले आहे.

यावेळी या महापुरुषांचे समाजासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या ऐतिहासिक कार्याविषयीही त्यांनी आत्मीयता व्यक्त केली आहे.

तर याच वेळी खासदार नवनीत राणा यांनी बागेश्वर बाबांना संत म्हणणे म्हणजे तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्याला संत म्हणतं असेल तर यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव ते काय असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तर आम्ही अशा पद्धतीच्या काही कुश्चित परंपरा आहेत. त्या टाळत गुढीला भगवी पताका उभारून शंभु राजांना अभिवादन करत असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.

अमोल मिटकरी यांनी उभा केलेल्या गुढीची आज दिवसभर चर्चा करण्यात येत होती. अमोल मिटकरी यांनी महापुरुषांना अभिवादन करणारी गुढी उभी केल्याने त्यांच्या गुढीचा चर्चा झाली आहे.