आज दुपारी अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. अमोल मिटकरी आज अकोल्यात विश्रामगृहात होते. मिटकरी विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. तेव्हा विश्रामगृहाबाहेर मनसैनिक आले. त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. यावर अमोल मिटकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेने केलेल्या हल्ल्याचा निषेध अमोल मिटकरींनी केला. लोकांचे जीव घेण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले होते का?, असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.
माझ्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. जाण्यापूर्वी ते एका स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटून गेले. मनसे जर सत्तेत येण्यापूर्वी असे हल्ले करत असेल. तर सत्तेत आल्यानंतर काय करतील विचार करा, असं अमोल मिटकरी म्हणालेत. मनसेचे नेते संदिप देशपांडे यांच्यावरही मिटकरींनी टीका केली आहे. संदीप देशपांडेला राज ठाकरे यांनी सिगारेट ओढली म्हणून कानाखाली मारली. संदीप देशपांडे यांनी एकट्यात येऊन मला भेटावं, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.
हे लोक दलित मुस्लिम लोकांना मारतील. मी नाव घेतलं नाही मग यांनी स्वतःवर का ओढून घेतलं? राज ठाकरे यांना त्यांच्या घरावर शिवाजी महाराजाचे नाव लावण्याचा अधिकार नाही. माझ्या घरावर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता..मला पोलीस संरक्षणची गरज नाही. सत्तेतल्या आमदारांला चार चार तास बसावं लागतं. हल्ला करन ही झुंडशाही आहे. माझ्यासारख्याला असा त्रास होत असेल तर सर्वसामान्य लोकांचे काय होत असेल, असं मिटकरींनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी काल पुण्यात बोलताना बोचरी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं. राज ठाकरे यांचा ‘सुपारीबाज’ असा उल्लेख केला होता. याच कारणामुळे मनसैनिक भडकले. त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला.