कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार नीलेश लंके (NCP Nilesh Lanke) यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis Govermnet) सरकार जोरदार टीका केली आहे. सरकारने आनंदाचा शिधा वाटप करण्याचे जाहीर केले मात्र, अजूनही अनेक गरिबांच्या घरी आनंदाचा शिधा पोहचू शकला नाही, त्यामुळे आनंदाचा शिधा न मिळाल्याने अनेक गोरगरीब जनतेची दिवाळी अंधारतच साजरी होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जे आश्वासन दिले ते पूर्ण झाल्याचे देखील लंके यांनी दावा केला आहे. याशिवाय परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत आमदार नीलेश लंके यांनी सरकारचा निषेध करत हे सरकार स्वतःच्या आनंदाची दिवाळी साजरी करत असल्याचा टोला लगावला आहे. शिंदे-फडणवीस सरकारला गोरगरीब जनतेची जाणीव नसल्याचे देखील लंके यांनी म्हंटले आहे.
खरंतर कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनीही आनंदाचा शिधा पोहचला नाही यावरून शिंदे-फडवणीस सरकारवर टीका केली होती.
दिवाळी सणाच्या निमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारने शंभर रुपयात चार वस्तु देण्याचे जाहीर केले होते, आनंदाचा शिधा असे त्याला नाव देण्यात आले होते त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती.
याच आनंदाच्या शिधा यावरून राज्यातील विविध भागात आनंदाचा शिधा पोहचला नसल्याचा दावा केला जात आहे, त्यातच हा शिधा जिथे पोहचला तिथेही उशिरा पोहचल्याचे बोललं जात आहे.
कॉँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी याबाबत आनंदाच्या शिधा पाकीटावर फोटो न लागल्याने शिधा उशिरा पोहचत असल्याचे म्हंटले होते.
त्यातच ग्रामीण भागात आणि अती दुर्गम भागात इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अडचण येत होती, त्यामुळे शिधा पोहचूनही शिधा नागरिकांना मिळत नव्हता.
एकूणच आनंदाचा शिधा हा उपक्रम चांगला असला तरी अनेक ठिकाणी पोहचू न शकल्याने, उशिरा मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती.
केंद्र सरकारनंतर अशी मुभा राज्य सरकारने दिल्याने पहिल्यांदाच कमी किमतीत नागरिकांना रेशन दुकानात चार वस्तु मिळाल्याने आनंदाच्या शिधा मिळाल्याने अनेकांची दिवाळी गोड झाली आहे.
यावरून काही ठिकाणी आनंदाचा शिधा पोहचू न शकल्याने आमदार नीलेश लंके यांनीही नाराजी व्यक्त करत सरकारला लक्ष करत टीका केली आहे.