मुंबई : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्यावरील आरोपांसंदर्भात सविस्तरपणे भाष्य केले (NCP President Sharad Pawar).
राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे शरद पवार म्हणाले. तसेच, त्यांनी मंत्री नवाब मलिक यांची ठामपणे पाठराखण केली. नवाब मलिक हे राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्यावर कोणतेही वैयक्तिक स्वरुपाचे आरोप नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले आहेत. त्या नातेवाईकाला संबंधित यंत्रणेने (NCB) अटक केली आहे, असं शरद पवार म्हणाले.
“नवाब मलिकांचा आरोपाबाबत झालं तर त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप नाही. त्यांच्या नातेवाईकावर झाला. याबाबत संबंधित यंत्रणेने अटक केलं आहे. त्यामुळे त्या यंत्रणेने पूर्ण सहकार्य केलं आहे. तपास यंत्रणा त्या पद्धतीने काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना पूर्ण सहकार्य संबंधितांकडून केलं जाईल याची काळजी घेतली जाईल. नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाही. ते अनेक वर्षापासून महाराष्ट्रासाठी काम करतात. विधीमंडळात ते काम करतात. त्यांच्यावर आजपर्यंत आरोप झालेला नाही.”
“धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. मला भेटून एकंदर त्यांच्या आरोपाची स्थितीची सविस्तर माहिती मला दिली. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर काही तक्रारी झाल्या. त्याबाबत चौकशी सुरु झालेली असेल. हे प्रकरण असं होईल, व्यक्तीगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा, त्यामुळे त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली आणि कोर्टाचा एकप्रकारचा एक आदेश होता त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही”
पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर
“माझ्यामते त्यांच्यावरचा आरोप आणि त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे. साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. यासाठी पक्षाचे प्रमुख सहकारी आहेत, त्यांच्याशी अद्याप बोलणं झालेलं नाही.”
“पक्ष म्हणून, पक्षप्रमुख जे काही निर्णय घ्यावे लागतील, काळजी घ्यावी लागेल ते तातडीने निर्णय घेऊ” (NCP President Sharad Pawar)
“मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी याचा निर्णय होईल. त्यासाठी आम्ही आमचा निर्णय घेऊ, त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी लागणार नाही. आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निर्णय घ्यावी लागेल. त्यामध्ये कुणावर अन्यायही होणार नाही हे पाहावे लागेल”
धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल : शरद पवार रोखठोक https://t.co/xTLsve15Cf @PawarSpeaks @NCPspeaks #DhananjayMunde #renusharma #NawabMalik
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 14, 2021
संबंधित बातम्या :
राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य
धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? शरद पवार म्हणतात
मोठी बातमी: धनंजय मुंडेंना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावणार?