एक नवाब, सौ जबाब; मालिकांच्या अटकेविरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

| Updated on: Feb 24, 2022 | 2:22 PM

एकीकडे मुंबई मलिकांच्या अटकेविरोधात मंत्रालयाबाहेर महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि आमदारांनी हजेरी लावली. तर दुसरीकडे नाशिकमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीने जोरदार आंदोलन करून निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी 'एक नवाब, सौ जबाब', 'ना डरेंगे, ना झुकेंगे' अशी घोषणाबाजी केली.

एक नवाब, सौ जबाब; मालिकांच्या अटकेविरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने
नाशिकमध्ये नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात निदर्शने करण्यात आली.
Follow us on

नाशिकः महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या ईडी अटकेविरोधात नाशिकमध्ये गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. एकीकडे मुंबई मलिकांच्या अटकेविरोधात मंत्रालयाबाहेर महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि आमदारांनी हजेरी लावली. तर दुसरीकडे नाशिकमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीने जोरदार आंदोलन करून निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘एक नवाब, सौ जबाब’, ‘ना डरेंगे, ना झुकेंगे’ अशी घोषणाबाजी केली. आता उद्यापासून पुन्हा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सकाळी हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

काय दिला इशारा?

अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पहाटे पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी घराची झडती घेत चौकशीला सुरुवात केली. अधिकाऱ्यांच्या चौकशीला पूर्णपणे सहयोग देऊन सुद्धा केंद्र सरकारच्या सूडबुद्धीमुळे अंडरवर्ल्डशी संबंध व मनी लॉंड्रिग या आरोपाखाली राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकले होते. त्यामधून अंडरवर्ल्ड असलेला संबंध, कथित बेकायदेशीर खरेदी आणि मालमत्तांची विक्री, हवाला व्यवहार असे विविध आरोप त्यांच्यावर लावण्यात आले असून, त्यांना देशद्रोही ठरवत असल्याचा केंद्र सरकारचा डाव हाणून पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला. त्यांना कॅबिनेट मंत्री नवाब मलिका यांच्या अटकेचा जोरदार निषेध नोंदवला.

जोरदार घोषणाबाजी

नाशिकमध्य दुपारी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी तरुणांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. येणाऱ्या काळात हे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या निदर्शनावेळी शादाब सय्यद, जय कोतवाल, बाळा निगळ, सागर बेदरकर, विशाल डोखे, राहुल कमानकर, कल्पेश कांडेकर, संतोष भुजबळ, निलेश सानप, डॉ.संदीप चव्हाण, विक्रांत डहाळे, हर्षल चव्हाण, प्रशांत नवले, रियान शेख, सुनील घुगे, अक्षय पाटील, विशाल माळेकरसोनू कागडा, गणेश खोडे, संतोष गोवर्धने, शहाद अरब, हाशीम शहा, रवी शिंदे, मुनावर शेख आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्याः

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?