मोठी बातमी ! अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच शरद पवारांनी उमेदवार बदलला

| Updated on: Oct 29, 2024 | 8:21 AM

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक असताना शरद पवार यांनी मोठं पाऊल उचलत उमेदवारच बदलला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शदर पवार गटाकडून मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाली होती.

मोठी बातमी ! अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच शरद पवारांनी उमेदवार बदलला
Image Credit source: ANI
Follow us on

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा आहे. अनेक पक्षांकडून उमेदवारांची दुसरी-तिसरी यादी जाहीर होत आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक असताना शरद पवार यांनी मोठं पाऊल उचलत उमेदवारच बदलला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शदर पवार गटाकडून मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या उमेदवार ठरल्या होत्या. मात्र त्यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले होते. आता शरद पवार यांनी मोठं पाऊल उचलत सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द केली असून सिद्धी यांच्याऐवजी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रदेखील दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. मात्र यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांसह अनेक जण नाराज झाले होते. त्यानंतर काल मोहोळ मधील इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली होती.

अखेर सिद्धी यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार आणि मोहोळ विधानसभेतील शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर सिद्धी कदम यांचा एबी फॉर्म रद्द करण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले. त्यामुळे सिद्धी यांची उमेदवारी रद्द झाली. त्या भेटीनंतर जयंत पाटील यांनी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता मोहोळमधून मविआतर्फे राष्ट्रवादीचे राजू खरे हे निवडणूक लढवणार असून त्यांचा सामना यशवंत माने यांच्याशी होणार आहे.

वडीलांच्या प्रचाराची सांभाळली होती धुरा

2019 च्या विधानसभेदरम्यान रमेश कदम जेलमध्ये असताना कन्या सिद्धी कदम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. रमेश कदम हे जामिनावर बाहेर आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळात झालेल्या घाटोळा प्रकरणात रमेश कदम यांना सलग 8 वर्षे जेलमध्ये राहावं लागलं. याशिवाय आगामी काळात त्यांचा जामीन रद्द झाला तर पुन्हा जेलमध्ये जावं लागलं तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. यामुळे शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याची चर्चा होती. मात्र अखेर आता हा निर्णय बदण्यात आला असून सिद्धी यांची उमेदवारी रद्द झाली आहे.