मोठी बातमी! ताज हॉटेलचं CCTV फुटेज अन् धनंजय मुंडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा बॉम्ब

| Updated on: Jan 08, 2025 | 8:43 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलं आहे, या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

मोठी बातमी! ताज हॉटेलचं CCTV फुटेज अन् धनंजय मुंडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा बॉम्ब
Follow us on

एक महिन्यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यात खळबळ उडाली. हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.  या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत असून, विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालांची भेट घेण्यात आली होती, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असं निवेदन यावेळी राज्यपालांना देण्यात आलं, दरम्यान या प्रकरणात आपण लक्ष घालू असं अश्वासन देखील राज्यपालांकडून या नेत्यांना देण्यात आलं आहे.

त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, आता अजित पवार यांच्याकडून हीच अपेक्षा  होती अजून काय अपेक्षा करणार? असं जानकर यांनी म्हटलं आहे. जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.  “धनंजय मुंडे म्हणजे “पुरुष वेश्या ” असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता, असं त्यांनी म्हटलं होतं. आपल्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा जानकर यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. तुमच्या पक्षाचे नेते आहेत, मग तुम्ही ताज, ओबरॉय हॉटेलचे CCTV फुटेज का काढत नाहीत?  CCTV फूटेज काढा महाराष्ट्र हादरून जाईल, असं जानकर यांनी म्हटलं आहे.

बीड प्रकरणात जिह्यात अराजकता निर्माण झाली आहे, राजकीय वरदहस्त लाभल्याशीवाय गुंड तयार होत नाहीत, राजकीय नेते गुंडांना लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पोसतात असंही यावेळी जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.