Sharad Pawar Chiplun Speech : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासाघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष कंबर कसून निवडणुकांची तयारी करताना दिसत आहेत. त्यातच आता तब्बल १८ वर्षांनी पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची चिपळूणमध्ये सभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी केंद्र सरकारबद्दल एक मोठा दावा केला आहे.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची चिपळूणमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पवार समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती. चिपळूण शहरातील बहादूरशेख येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर ही सभा पार पडली. यावेळी शरद पवारांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार कसं
“रशियात गेल्यावर एका अधिकाऱ्याने सांगितलं… इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी मॉस्कोला उतरल्या. त्यांना घ्यायला उपमंत्री आला. पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आला नाही. पंतप्रधानांची राहण्याची व्यवस्था एका वाड्यात केली. त्यांचं स्वागत केलं गेलं नाही. तिथे भारताचे राजदूत होते. इंदिरा गांधींनी राहण्याची व्यवस्था कुठे विचारलं. त्याने सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या, तुझं घर कुठे आहे. तिकडे मला घेऊन जा. मी तुमच्या घरी राहते. इंदिरा गांधी राजदूताच्या घराजवळ भारताच्या अन्य अधिकारी असतात. त्यांच्या मुलांना बोलावलं आणि त्यांच्याशी खेळत होत्या. तिकडे रशियाचे पंतप्रधान वाट पाहत होते. शेवटी त्यांनी उपपंतप्रधानांना राजदूताच्या घरी पाठवलं आणि इंदिरा गांधींची माफी मागितली. तुमचं स्वागत राज शिष्टाचाराप्रमाणे केलं नाही. त्याबद्दल माफ करा.
तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या, प्रश्न इंदिरा गांधींचा नाही. मी ८०कोटी भारतीयांची प्रतिनिधी म्हणून आली आहे. त्यांचा अपमान असेल तर मला कशाची किंमत नाही. पण हिंदुस्थानच्या ८० कोटी जनतेची इज्जत मला महत्त्वाची आहे. त्या इंदिरा गांधींची हत्या झाली. आणि आज देशाचे पंतप्रधान म्हणतात, या कुटुंबाने देशाला लुटलं. काय वाटलं पाहिजे बोलायला. राजीव गांधी देशासाठी सर्व दिलं. त्यांची हत्या झाली. हे झाल्यावर ते गेल्यावर त्यांची पत्नी सोनिया गांधी त्यांच्याबद्दल आम्ही राजकीय भूमिका घेतली. पण सोनिया गांधींनी परदेशात जाण्याचा विचार केला नाही. त्यांनी देशाची बांधिलकी ठेवली. त्या आणि त्यांची पिढी देशाच्या भल्याचा विचार करतात. देशाबाबत आस्था दाखवतात. असं असतानाही त्यांना पंतप्रधान भ्रष्टाचाराची पिढी म्हणतात. माझ्यासारख्यांना आश्चर्य वाटतं. देशाचा पंतप्रधान या पद्धतीने कसं बोलू शकतात”, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.
“ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्या सत्तेचा गैरवापर केला जातो. तुमच्या मूळ प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही. त्यासाठी या देशात परिवर्तनाची गरज आहे. ती गरज तुम्ही काही प्रमाणात भागवली. लोकसभा निवडणुकीत मोदी ४०० पार सांगत होते. त्याखाली येत नव्हते. ही भाषा बोलत होते. त्यांना भारताच्या जनतेने २४० जागा दिल्या. आज चंद्राबाबू, नितीश कुमार या दोन मुख्यमंत्र्यांची मदत झाली नसती तर दिल्लीतील मोदींचं सरकार तयार झालं नसतं. पण तरीही यातून काही शिकलं पाहिजे. त्या प्रकारची भूमिका घेतली जात नाही”, असेही शरद पवार म्हणाले.