मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. नुकतंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यावर अनेक ट्विस्ट त्यात आले आहेत. त्याची पूर्ण जबाबदारी पोलिसांवर विश्वासाने टाकूया ते जे काही चौकशी करतील,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Supriya Sule Comment on Dhananjay Munde Case)
“धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यावर अनेक ट्विस्ट त्यात आले आहेत. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय यात गोंधळ निर्माण झाला आहे. काहीही समजेनासं झालं आहे. विषय अतिशय संवेदनशील आहे. कोणताही आरोप जेव्हा त्या कुटुंबावर होतो, त्या कुटुंबात इतरही लोक असतात. भारतातील कुटुंब म्हणजे कपल नसतं. ती फॅमिली कशातून जाते याचा आपण दोन्ही बाजूंचा आपण सर्वांनी विचार करायला हवा,” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
“महाराष्ट्रातील पोलिसांवर आपल्या सर्वांचे प्रचंड प्रेम, विश्वास आणि आदर आहे. याप्रकरणी जे ट्वीस्ट येत आहे, त्याची पूर्ण जबाबदारी आपण पोलिसांवर विश्वासाने टाकूया. ते जे काही चौकशी करतील, त्यानंतर आपल बोलणं योग्य आहे,” असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.
आमचं सरकार हे दडपशाहीचं सरकार नाही. आमच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार आहे. त्यांनी दिलेल्या संविधानाचा आदर्श ठेवत भाजपला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. जेवढी वर्ष सरकार आहे, तेवढी वर्ष त्यांनी जरुर आंदोलन करावी. माझ्या त्यांच्या सर्वच आंदोलनाना शुभेच्छा आहेत, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला.
कोणत्याही गोष्टीच्या नामांतराबाबत चर्चेतून मार्ग निघायला हवा. त्यात अर्थात शहर, गाव यासारखे स्टेक होल्डर्स यांचे मार्गदर्शन घेऊन मार्ग काढायला हवा, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी औरंगाबाद मुद्द्यावर बोलताना दिली.
संवदेनशील नेतृत्व म्हणून मी आदित्य ठाकरेंचे काम बघत आहे. गेल्या एक वर्षात मी त्यांचं काम पाहिलं आहे. ते अंत्यंत चांगल्या प्रकारे तयार होत आहे, याचा मला आनंद आहे, असेही त्या म्हणाल्या.
रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले.
त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदुरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.” (Supriya Sule Comment on Dhananjay Munde Case)
संबंधित बातम्या :