राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने काढली अजित दादांची ताकद, म्हणाले ‘तर भाजप पक्षही काबीज…’

| Updated on: Aug 29, 2023 | 8:32 PM

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असूनही त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, यावरून शरद पवार गटाच्या नेत्याने पाटील यांना मोठा टोला लगावला.

राष्ट्रवादीच्या या नेत्याने काढली अजित दादांची ताकद, म्हणाले तर भाजप पक्षही काबीज...
AJIT PAWAR AND CHANDRAKANT PATIL
Follow us on

पुणे : 29 ऑगस्ट 2023 । राष्ट्रवादीमधील ‘दादा’ नेते अजित पवार यांच्या सत्ता प्रवेशामुळे शिंदे गटाची कुचंबणा होत आहेच. त्या शिवाय आता राज्यातल्या सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे आमदार आणि मंत्री यांचीही कुचंबणा होत आहे. अजित पवार यांच्या सत्ता सह्भागानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही मंत्र्याचे पालकमंत्री पद बदलले. तर, पुण्याचे पालकमंत्री पद भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडेच ठेवले. मात्र, पुण्याचे पालकमंत्री असूनही अजितदादाच बैठका घेत असल्याने हेविवेट मंत्री चंद्रकांत पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे.

अजित दादा यांच्या या बैठकांच्या ‘दादागिरी’ला कंटाळून मंत्री चंद्रकात पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे. अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे अधिकारी संभ्रमात आहेत. त्यामुळे अजितदादा यांची तक्रार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात हे शीतयुद्ध सुरु आहे. या शीतयुद्धावर राष्ट्रवादीचे (शरद पवार) गटाचे नेते अंकुश काकडे यांनी बोचरी टीका केली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी अजित दादा यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे असे समजते. पण, अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना जिल्ह्याचा आढावा घेण्याचा अधिकार आहे असे काकडे म्हणाले.

‘अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात त्यांच्याइतका ट्रिपल इंजिनचा सक्षम नेता नाही’, असा टोला काकडे यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. ‘चंद्रकांत दादा आणि अजित दादा यांच्या काम करण्याच्या पद्धतीत फार मोठा फरक आहे’, असेही ते म्हणाले.

‘अजितदादा अधिकाऱ्यांना ज्या सूचना करतात त्याची अंमलबजावणी झाली नाही तर अधिकाऱ्याची कानउघडणी करतात. अजितदादा आल्यामुळे पुणे शहर किंवा जिल्हा असेल महाराष्ट्रातदेखील अनेक जिल्ह्यात भाजपची मोठी कुचंबना होतेय ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.’

‘उद्या जर अजित पवार यांनी भाजप पक्ष काबीज केला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण तेवढी ताकद त्यांच्य़ात आहे’, अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.