पुणे : पुण्यावरून हवाई प्रवास करत असाल किंवा करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. लोहगाव विमानतळ प्रशासनाने याबाबत विशेष आवाहन केले आहे. सणासुदीच्या काळात होणारी गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना या नव्या नियमांचे पालन न केल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुणे विमानतळावर वर्षाअखेर आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. विमानांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याने लोहगाव विमानतळ प्रशासनाने नागरिकांना विमानतळावर तीन तास अगोदर येण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय 7 किलोपर्यंतची एकच बॅग जवळ ठेवावी अशा सूचना केल्या आहे. त्यामुळे सुरक्षा तपासणी अधिक जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याचे आवाहनात म्हंटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विमानाने प्रवास करत असतांना विशेष आवाहन पुणे लोहगाव विमानतळ प्रशासनाने केल्याने त्याचे पालन करणे गरजेचे असणार आहे.
पुणे येथील लोहगाव विमानतळ प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर काही खास आवाहन केले आहे, त्याचे पालन येणाऱ्या काळात प्रवाशांना करावे लागणार आहे.
पुणे लोहगाव विमानतळ येथून प्रवास करत असतांना तीन तास अगोदर विमानतळ येथे पोहचावे लागणार आहे, त्यामध्ये सात किलो पर्यन्तचीच बग जवळ बाळगावी लागणार आहे.
वर्षाअखेर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून हवाई प्रवास करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, विमानांची संख्या वाढत चालली आहे.
सणासुदीच्या काळात वाढलेल्या गर्दीमुळे चेकिंग साठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी विमानतळावर तीन तास आधी पोहोचण्याचे प्रशासनाने हे आवाहन केले आहे.
गेला काही दिवसापासून पुणे विमानतळावर उड्डाणे वाढली असून प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यानंतर होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.,
याशियाव जलद गतीने सुरक्षा तपासणी व्हावी यासाठी सात किलो पर्यंतची एकच बॅग जवळ ठेवा अशी सूचना देखील प्रवाशांना केली जात आहे.