नवा ट्विस्ट, ईव्हीएम अनलॉक प्रकरणी मोठा खुलासा, वादावर पडदा पडणार ?

| Updated on: Jun 17, 2024 | 10:30 AM

ईव्हीएम हॅकिंगचा आरोप निवडणूक आयोगाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे.  या बातम्यांबाबत काही लोकांनी ट्विट केले आहे. मात्र हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान वंदना सूर्यवंशी यांच्या या स्पष्टीकरणानंतर ही बातमी देणाऱ्या पेपरनेही दिलगिरी व्यक्त केली आहे.

नवा ट्विस्ट, ईव्हीएम अनलॉक प्रकरणी मोठा खुलासा, वादावर पडदा पडणार ?
Follow us on

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर -पश्चिम लोकसभा मतदार संघातील निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला. शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये अमोल किर्तीकर यांना हरवून रवींद्र वायकर यांनी विजय मिळवला. मात्र या प्रकरणात एक मोठा ट्वीस्ट आला आहे. त्यावरुन मोठा वादही निर्माण झाला. वायकरांच्या नातलगांकडे असलेला फोन ईव्हीएम हॅक करु शकत होता म्हणून शंका वर्तवली गेली, अशी बातमी एका वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आणि त्यावरून नवा वादंग सुरू झाला. मात्र ईव्हीएम हॅकिंगचा आरोप निवडणूक आयोगाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे.  रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, या बातम्यांबाबत काही लोकांनी ट्विट केले आहे. मात्र हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची गरज नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यामुळे याप्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. दरम्यान वंदना सूर्यवंशी यांच्या या स्पष्टीकरणानंतर ही बातमी देणाऱ्या वर्तमानपत्रानेही दिलगिरी व्यक्त केली आहे.

‘वायकर यांच्या नातेवाईकांकडे ईव्हीएम अनलॉक करणारा फोन होता’ या अहवालात अनवधानाने असा उल्लेख करण्यात आला आहे की आरोपी व्यक्तीने ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी तयार करण्यासाठी आपला मोबाइल फोन वापरला. ही चूक झाल्याबद्दल दिलगीर आहे, असे त्या वृत्तपत्राने नमूद करत चुकीबद्दल माफी मागितली आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाकडे ईव्हीएम अनलॉक करण्याचा फोन असल्याची बातमी या इंग्रजी वृत्तपत्राने दिली होती. आज त्याबाबत स्पष्टीकरण देत इंग्जी वृत्तपत्राने बातमी फेटाळून दिलगिरी व्यक्त केली. या वृत्तपत्राच्या बातमीची सोशल मीडियावर जोरदार जोरदार चर्चा झाली होती. मात्र आता रिटर्निंग ऑफीसरने दिलेले स्पष्टीकरण आणि संबंधित वृत्तपत्राने दिलगरी व्यक्त केल्यानंतर या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

वंदना सूर्यवंशी काय म्हणाल्या ?

निवडणूक अधिकारी वंदन सूर्यवंशी यांच्या सांगण्यानुसार ईव्हीएम हे कोणत्याही फोनशी कनेक्ट होत नाही. मतमोजणीवेळी आतमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नसते. फक्त एनकोअर नावाच्या यंत्रणेला मोबाईल नेण्याची परवानगी दिली गेली. ईव्हीएम अजिबात हॅक होऊ शकत नाही. ते हॅक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही वस्तुस्थिती नाही. हा मोबाईल अनधिकृत व्यक्तीने वापरला असल्याची तक्रार आम्ही केली आहे. ईव्हीएममध्ये लॉग इन करण्यासाठी फक्त पासवर्ड आवश्यक आहे. त्याचा मोबाईलशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण ?

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा निकाल देशभर गाजला. आधी निकालावरुन वाद झाला, आणि आता मतमोजणी पद्धतीत थेट ईव्हीएम हॅकिंगचा आरोप झाला. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रविंद्र वायकरांमध्ये लढत झाली. 4 जूनला ईव्हीएम मतमोजणी संपल्यानंतर ठाकरे गटाचे कीर्तीकर अवघ्या १ मतानं आघाडीवर होते. नंतर यात पोस्टल मतं अॅड केली गेली. यात वायकरांना ४९ मतं जास्त पडल्यानं वायकरांना ४८ मतांनी विजयी घोषित केलं गेलं. पोस्टल मतं साधारण 3 हजार होती, त्यापैकी 111 मतं बाद करण्यात आली होती. यावेळी वायकरांचे नातलग मतमोजणी केंद्रात परवानगी नसताना मोबाईल फोनसह वावरत होते म्हणून तक्रारी झाल्या. अपक्ष उमेदवारानंही तक्रार दिली. मात्र त्यांच्या आरोपांनुसार ती तक्रार घेतली गेली नाही. त्यानंतर ‘मिड डे’ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली, ज्यात वायकरांच्या नातलगांकडे असलेला फोन ईव्हीएम हॅक करु शकत होता म्हणून शंका वर्तवली गेली. तिथूनच नव्या वादाची सुरुवात झाली.