कोल्हापूर : काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरातला जयप्रभा स्टुडिओ (Jaybhrabha Studio) वादत सापडल्याचे आपण पाहिले आहे. यावरून निदर्शनेही झाल्याचे दिसून आले. मात्र या प्रकरणात आता नवं वळण आले आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Khirsangar) यांनी याच वादावरून मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन एक मागणी केली आहे.कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जागा प्रशासनाला देण्यास तयार आहे. मात्र मुलांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. संबंधित फर्मला पर्यायी जागा देण्यात यावी. अशी मागणी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे समोर आले खरेदी करणाऱ्या फर्ममध्ये राजेश क्षीरसागर यांच्या दोन्ही मुलांची नावं समोर आली. त्यामुळे क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. त्यानंतर हा वाद बरच वााढला होता आणि माध्यमांसमोर आला होता. त्यावर आता राजेश क्षीरसागर यांनी त्यांची बाजू मांडली आहे. त्यामुळे या वादावर आता तरी तोडगा निघणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
राजेश क्षीरसागर यांची मागणी काय?
आज राजेश क्षीरसागर यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांची भेट घेतली. यानंतर जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार असल्याचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवले. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याकरिता महानगरपालिकेकडून प्रस्ताव मागितला असल्याची माहिती देखील क्षीरसागर यांनी दिली आहे. ही जागा महापालिकेकडे देण्यास संबंधित फर्म तयार आहे. मात्र त्या फर्मला शासकीय नियमाप्रमाणे पर्यायी जागा द्यावी. अशी विनंती क्षीरसागर यांनी केली. शिवाय यामध्ये विनाकारण राजकारण करु नये असं आवाहन देखील क्षीरसागर यांनी केले. त्यामुळे हा वाद आता संपण्याची चिन्हं आहेत.
दोन वर्षापूर्वीच विक्री झाल्याची माहिती
कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेची दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे कोल्हापुरातील कलाप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीच्या या ऐतिहासिक जागेची विक्री होऊ नये यासाठी कोल्हापूरकर लढा देत होते. मात्र आज ही जागा विकली गेल्याचे माहिती समोह आली आल्यानंतर आता कोल्हापूरात नव्या वादाला तोंड फुटल आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओमध्ये उभा करण्याच्या हालचाली सुरू असतानाच स्टुडिओची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. लतादीदींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओ परिसरात उभा करण्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर ही धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. 15 फेब्रुवारी 2020 रोजी 6 कोटी 50 लाखाचा व्यवहार या जागेचा झाला आहे.
भाजपकडून महावितरणच्या खासगीकरणाच्या वावड्या, खासगीकरणाबाबत ऊर्जामंत्री काय म्हणाले?
मालेगावात दंगल घडविण्याचा कट कुणाचा? झेंड्यांवरून वाद पेटवायचे कारस्थान