राहुल ढवळे, टीव्ही 9 मराठी, इंदापूर : ठाकरे घराण्यातील (Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) गटाशी जवळीक असलेले निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांनी राजकीय परिस्थितीवर बोलत असतांना एक मोठं विधान केले आहे. सध्या तरी राजकारणात येणाच्या विचार नाही, पण नाही म्हणत नाही, आणि जर राजकारणात आलोच तर बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना भुवया उंचवणारे विधान केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे जावई निहार ठाकरे यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. याशिवाय धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार याचा अंदाज निहार ठाकरे यांनी लावत शिंदे गटाबाबत महत्वाचे भाष्य केले आहे.
इंदापूर येथे टीव्ही 9 मराठी शी संवाद साधत असतांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी राजकारणात सक्रिय होणार का ? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना निहार ठाकरे म्हणाले, ठाकरे गटाने दिलेली 2 लाख 50 हजार प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने रद्द केली आहेत.
ते आत्ताच समझले, त्याचे कारण ही असे समजत आहे की ते सर्व प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाच्या फार्मेट मध्ये नव्हते.
याचा नक्कीच फटका हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला बसू शकतो, यात प्रमुख मुद्दा असा आहे की बहुमत कुणाकडे आहे, ज्यांच्याकडे जास्त आमदार, खासदार असतील त्यांच्याकडे.
ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनाच निवडणूक आयोग धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह देईल. या नियमानुसार निवडणूक आयोग बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल असा विश्वास निहार ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर आपण राजकारणात प्रवेश करणार का ? या प्रश्नावर बोलताना निहार ठाकरे म्हणाले, प्रवेश करणार नाही असं मी म्हणत नाही.
पण जर प्रवेश केलाच तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्नशिल राहील. असे म्हणत सध्या राजकारणात नाही पण नंतर राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले आहे.