पुणे : वसंत मोरे यांचे खंदे समर्थक असल्याने बाजूला सारत असल्याने आणि अंतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिलेल्या नीलेश माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता. काही दिवसांपूर्वी नीलेश माझिरे यांनी मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नीलेश माझिरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांची भेट घेतली होती. त्यामुळे नीलेश माझिरे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशी शक्यता होती. त्यातच वसंत मोरे हे देखील मनसेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीत प्रवेश करतील अशी शक्यता होती. त्यामुळे वसंत मोरे हे आणि त्यांचे खंदे समर्थक नीलेश माझिरे हे एकाच वेळी पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती. त्यातच वसंत मोरे यांनी अजूनही मनसेला राम-राम ठोकलेला नाही. त्यामुळे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक असलेल्या नीलेश माझिरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित केले आहे. आज सायंकाळी त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे.
मनसेचे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक असलेले नीलेश माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करून आता नव्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळी मोठ्या जल्लोषात पक्षप्रवेश होणार आहे.
निलेश माझिरे आज शिंदे गटात प्रवेश करणार, मुंबईत वर्षा बंगल्यावर संध्याकाळी पक्ष प्रवेश होणार आहे. निलेश माझिरे हे मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते, माझिरे हे वसंत मोरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
बाळसाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटात नीलेश माझिरे हे पक्षप्रवेश करत असतांना वसंत मोरे हे कोणत्या पक्षात जाणार याबाबत चर्चा होऊ लागली आहे. पुण्यात राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
वसंत मोरे यांची नाराजी उघड आहे, त्यामुळे वसंत मोरे यांना मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तात्या कधी येताय तुमची वाट पाहतोय असं म्हंटलं होतं, त्यामुळे वसंत मोरे यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात जाण्याची चर्चा सुरू झाली होती.
वसंत मोरे आणि नीलेश माझिरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण पुण्याला ठाऊक आहे, त्यातच आता नीलेश माझिरे शिंदे गटात जाणार असल्याने वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.