मुंबई : राज्यातलं राजकारण सध्या टोकाला पोहोचले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर दुसरा हल्ला झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपातही आता आणखी धार आली आहे. भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही आता महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. मी सोमय्या साहेबाना सांगण्यासाठी आलो आहे की आपला शत्रू नीच आहे. अशा लोकांसोबत कसे वागायचे असते, यांच्याशी बोलण्याची भाषा वेगळी असते. जे काही चाललं आहे ते महाराष्ट्र बघतोय. अस या आधी कधीच झालं नव्हतं. कोणाच्याही घरी जा दगडी मारा हे कधीच घडलं नव्हतं, असे म्हणत त्यांनी राज्याच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता हा वाद आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
निलेश राणे यांनी यावरून हल्ला चढवताना, आज परिस्थिती बिकट झाली आहे. आज जीवाला जरी धोका असला तरी देखील इथे केसेस होत नाही. मी बाकीच्या नेत्यांनी ही सांगणार आहे. ज्यांना जी भाषा समजते त्या भाषेत उत्तर द्यावे लागणार. महाराष्ट्र अशाच गोंधळलेल्या अवस्थेत असला तर या सारकारला चांगलचं आहे. करण त्यांनी काही केलेच नाही. संजय पांडे यांच्यासारखे आयुक्त आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखे अधिकारी जो पर्यंत आहेत तो पर्यंत असेच हल्ले हे होत राहणार, असे म्हणत त्यांनीपोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. म्हणून आता दया माया नाही. सगळ्या नेत्यांना सांगणार लढाई त्यांनी रस्त्यावर आणली. ती लढाई रस्त्यावर आपण संपवायची आहे, असे म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.
राणा यांच्या कस्टडीवरही त्यांनी भाष्य केले आहे. जे न्यायालयाने सांगितले आहे आणि जो निकाल दिला आहे. त्यावर मी बोलणं उचित ठरणार नाही. पण महाराष्ट्रात खोट्या केसेस कशा बनवल्या जातात हे दिसून येतंय. वरून सारदेसाई घरावर जातात घोषणा देतात पोलीस बॅरिगेटिंग तोडतात त्यांच्यावर केसेस नाही. खार पोलीस स्थानकाच्या बाजूला दगडं नाहीत, त्यामुळे मला महित आहे. तिथे दगडं कुठून आली, ब्लॉक उचलून फेकण्यात आले, जीव गेला असता त्यात, शिवसेना राष्ट्रवादी वाले याना संगळं माफ आहे. हे लोक तुमच्या घरात घुसण्यासाठी कमी जास्त करणार नाही. अशी भयाव परिस्थिती कधी नव्हती. महाराष्ट्र कोणाचा आहे. ते येत्या काळात कळेलच अशा लोकांना फटके मिळाल्या शिवाय कळणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.
तसेच आम्ही कुठे जावं कुठे नाही. हे संजय राऊत यांनी सांगणं गरजेचं नाही. संजय राऊत यांनी जनतेतून निवडून दाखवावं पाहिले. त्यांनी नगरसेवकांची निवडणूक जिंकून दाखवावी. हा महाराष्ट्र जेवढा त्यांचा तेवढाच आमचं आहे. आज सत्ते मध्ये आहेत म्हणून मजा मारत आहेत. पण जेव्हा वेळ पालटले तेव्हा बघा कशी पलटी खाल, हेही महाराष्ट्र बघेल. राणा दाम्पत्य यांना भाजपनेपुढे केल्याचं बोलत आहेत. पंरतु हा सगळा शिवसेनेचा अजेंडा आहे. 106 आमदारांचा पक्ष भाजप आहे. कोणालाही पुढे करण्याची गरज नाही, असा टोलाही राणे यांनी लगावला आहे.
Akola Shiv Sena | भोंगा कोणाचा, हनुमान चालीसा कोण बोलतेय? सचिन अहीर यांची भाजपवर खोचक टीका!