वर्धा : केंद्रीय मंत्री निती गडकरी यांना आज (6 फेब्रुवारी) पत्रकारांनी तुम्ही विरोधात असताना पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराविरोधात आंदोलनं केलीत. मात्र, आता दर गगनाला भिडताय मग गप्प का? असा सवाल केला. यावर नितीन गडकरींनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आमचं सरकार असताना आम्ही कसं आंदोलन करायचं? जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत होतो. आता सरकारमध्ये आहोत. आता आम्ही आंदोलन न करता पेट्रोल डिझेलचा पर्याय शोधत आहोत” (Nitin Gadkari answer why BJP is silent over Fuel Price hike in India)
“भंडारा, चंद्रपूर, वर्धा येथील सर्वांच्या मोटारसायकल आणि कारमध्ये आम्ही तयार केलेलं इथेनॉल आहे. आता अशी टेक्नॉलॉजी आणत आहोत की 95 रुपयांचं पेट्रोल घेण्याऐवजी तुम्हाला 60 रुपये लिटर इथेनॉल मिळेल. इथेनॉलचे पंप येत्या दोन तीन महिन्यात सगळीकडे सुरू करू. आता अनेक गाड्या 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या येत आहेत. टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन मदत करण्याचा प्रयत्न आहे,” असंही गडकरी यांनी सांगितलं.
काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करताहेत : नितीन गडकरी
नितीन गडकरी म्हणाले, “तीन कृषी कायद्यांमधील कोणता कायदा शेतकरी विरोधी आहे, हे सांगावं. शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतमालाचे भाव ठरविण्याचे अधिकार नाहीत काय? हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात नाहीये. आम्ही तीन शेतकरी कायदे बनवले. यातील कोणते कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे ते सांगावे. जर आपण बाजारात माल विकतो आहोत आणि शेतकऱ्याला त्याचा जास्त भाव मिळतो तर तो विकण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही का?”
“औषधं, चहा, नास्ता, कापड यांचे मागितलेले भाव आम्ही देतो, मग शेतकऱ्यांनी मागितलेल्या भाव शेतकऱ्यांना मिळायला नको का? आपल्याकडे गहू, तांदूळ आणि साखर सरप्लस आहे. त्यामुळे निर्यात करताना आणि हमीभाव ठरवताना सरप्लस ही समस्या आहे. आंतराष्ट्रीय किमती आणि राष्ट्रीय किमती यातील तफावत मोठी आहे. हे पहिलं सरकार आहे ज्यांनी एमएसपीसाठी साडेतीन लाख कोटी दिलेय,” असंही गडकरी म्हणालेय.
हेही वाचा :
जुनी वाहनं स्क्रॅप करण्यासाठी सरकार प्रोत्साहन निधी देणार
गडकरीजी मानलं… 24 तासांत ‘एक्स्प्रेस वे’चा अवघड भाग बांधला; विश्वविक्रमाचे फडणवीसांकडून कौतुक
वाहन स्क्रॅपेज धोरण लागू झाल्यावर 50000 हजार नोकऱ्या मिळणार; एक कोटी गाड्या रिजेक्ट होणार
व्हिडीओ पाहा :
Nitin Gadkari answer why BJP is silent over Fuel Price hike in India