मुंबई: औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे (Shivsena) आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही. ज्यांची छुपी युती आहे ती त्यांना लखलाभ असो, असं सांगतानाच औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? तुम्ही विचारच कसा करू शकता? असा विचार करणंच एक आजार आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना एमआयएमसोबतच्या (MIM) आघाडीची चर्चा फेटाळून लावली. शिवसेनेने जरी एमआयएमसोबतच्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
शिवसेना हा शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारा पक्ष आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श असतो. ते महाराष्ट्राचे आदर्श होऊच शकत नाहीत. ते शिवसेनेचे आदर्श होऊच शकत नाहीत. त्यामुळे एमआयएम आघाडीत येणार या अफवा आहेत. एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. हे तुम्ही बंगाल आणि उत्तर प्रदेशातही पाहिलं आहे. जे आधीच भाजपसोबत छुप्या युतीत काम करत आहेत. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाच संबंध येत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
एमआयएम ही भाजपची बी टीमच आहे. हे उत्तर प्रदेशात स्पष्ट झालं. बंगालमध्ये आम्ही पाहिलं. ज्यांना भाजपचा पराभव उत्तर प्रदेशात करायचा होता तर त्यांनी काळजीपूर्वक पावलं टाकायला हवी होती, असं सांगतानाच इम्तियाज जलील हे खासदार आहेत. दिल्लीत आमची त्यांच्याशी भेट होते. कुणासोबत भेट झाली म्हणजे आघाडी झाली असं होत नाही. महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे. चौथा त्यात येणार नाही. तीनच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Aurangabad | भाजपाला हरवण्यासाठी MIM महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार, Imtiaz Jaleel यांचं मोठं विधान
MIM आणि शिवसेना कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल; फडणवीसांचा घणाघात